शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

आदित्य ठाकरेंनी घेतली 'त्या' चहावाल्याची भेट! शिवसैनिकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

By नितिन गव्हाळे | Updated: November 7, 2022 13:18 IST

Aaditya Thackeray: विमानतळावर हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली. विमानतळाबाहेरही शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत केले. 

अकोला: युवा सेनेचे प्रमुख व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेनिमित्त सकाळी ११ वाजता शिवणी विमानतळावर आगमन झाले. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी... जय शिवाजी अशा घोषणा देत, जोरदार शक्तीप्रदर्शन केले. विमानतळावर हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली. विमानतळाबाहेरही शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत केले. 

शहरात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी नियोजित अकोला दौरा असल्याने, त्यांचे विमानाने सकाळी शिवणी विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पासेस असलेल्या शिवसैनिकांनाच विमानतळाच्या आत सोडण्यात येत होते. विमानतळ परिसर व समोर हजारो शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी जमले होते. 

विमानतळावर आदित्य यांचे आगमन झाल्यावर शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, मंगेश काळे, श्रीरंग पिंजरकर, राहुल कराळे, देवश्री ठाकरे, शुभांगी किनगे, अकोटच्या माजी नगराध्यक्ष डॉ. मनिषा मते, प्रा. प्रकाश डवले, मनिष मोहोड, अक्षय खुमकर आदींनी त्यांचे स्वागत केले. 

विमानतळाच्या बाहेर आदित्य ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा आल्यावर, जमलेल्या हजारो शिवसैनिकांना, त्यांनी कारमधून बाहेर येत अभिवादन केले. हस्तांदोलन करीत, त्यांचे स्वागत स्विकारले.

शिवसैनिकांनीकडून चौकाचौकांत स्वागतयुवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांनी शिवणी येथे, नेहरू पार्क चौक, गांधी रोड, जय हिंद चौकात उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत, जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आदित्य यांच्या स्वागतासाठी शहरातील चौकांमध्ये भगव्या पताका, झेंडे आणि फ्लेक्स, बॅनर लावण्यात आले होते.

आदित्य ठाकरेंनी घेतली 'त्या' चहावाल्याची भेट!अकोल्यातील नेहरू पार्क चौकातील चाय विक्रेता मुरलीधर माधवराव सुर्वें हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या चहाच्या दुकानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा आहेत. त्यांची पूजा करून सुर्वेंचा दिनक्रम सुरू होतो. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या दौऱ्यातून थोडा वेळ काढून मुरलीधर सुर्वे यांच्या चहाच्या दुकानाला भेट दिली आणि गुलाबहार घालून त्यांचा सत्कार केला. बाळासाहेब ठाकरेंप्रति सुर्वे यांची निष्ठा आणि प्रेम पाहुन आदित्य ठाकरे भारावून गेले होते.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAkolaअकोला