शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बीएलओच्या जबाबदारीसाठी अतिरिक्त शिक्षक टार्गेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:50 IST

अकोला: निवडणुक आयोगाच्या २0१९ च्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमातर्गंत मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या कामासाठी खासगी शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना टार्गेट केल्याचा जात असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.

अकोला: निवडणुक आयोगाच्या २0१९ च्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमातर्गंत मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या कामासाठी खासगी शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना टार्गेट केल्याचा जात असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. बीएलओचे काम अतिरिक्त शिक्षकांवर लादल्या जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. निवडणुक कामासाठी अतिरिक्त शिक्षकांवरच जबाबदारी का? असा सवालही उपस्थित होत आहे.काही दिवसांपूर्वी मतदार यादी पुर्नरिक्षण आणि निवडणुक कामासाठी तहसिल कार्यालयाने माध्यमिक शिक्षण विभागाकडे शिक्षकांची यादी मागितली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेसोबतच खासगी शाळांमधील शिक्षकांच्या नावांची यादी दिली. परंतु या यादीमध्ये नियमित शिक्षकांना शिक्षण विभागाने वगळून अतिरिक्त शिक्षकांची नावे निवडणुक विभागाकडे दिली आहेत. यामुळे अतिरिक्त शिक्षक नाराज झाले आहेत. आम्ही अतिरिक्त ठरलो. म्हणून शिक्षण विभाग वाट्टेल ते काम आमच्यावर थोपविणार आहे का? अतिरिक्त शिक्षक सुद्धा नियमित शिक्षकांसारखे विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतात. नियमित तासिका घेतात. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना वेगळी वागणुक का? असा सवाल अतिरिक्त शिक्षकांनी उपस्थित केला. शिक्षण विभागाने आमच्यावर अन्याय करू नये. सर्वांना समान वागणुक द्यावी आणि अतिरिक्त ठरलेल्या महिला शिक्षकांना या कामातून वगळण्यात यावे. अशी मागणी अतिरिक्त शिक्षकांनी केली आहे. (प्रतिनिधी)अतिरिक्त शिक्षकांकडे कार्यभार नाही. ते वेतन घेत आहेत. निवडणुकीचे काम राष्ट्रीय कार्य आहे. त्यांनी ते करायलाच हवे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होत नाही. तोपर्यंत त्यांना कार्यभार उपलब्ध होणार नाही. हेवेदावे करू नयेत.प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक जि.प.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक