कार्यकर्त्यांनी कोरोना नियमाचे भान ठेवावे - राजेंद्र शिंगणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 08:19 PM2021-06-14T20:19:30+5:302021-06-14T20:19:40+5:30

Rajendra Shingane News : नियम पाळलेतरच खऱ्याअर्थाने कोरोना मुकाबला करता येणे शक्य असल्याचे ना. शिंगणे म्हणाले.

Activists should be aware of Corona rules - Rajendra Shingane |  कार्यकर्त्यांनी कोरोना नियमाचे भान ठेवावे - राजेंद्र शिंगणे 

 कार्यकर्त्यांनी कोरोना नियमाचे भान ठेवावे - राजेंद्र शिंगणे 

googlenewsNext

मूर्तिजापूर :  अलीकडे पक्षाचे कार्यक्रम घेताना कोविड नियमाचे काटेकोरपणे गरजेचे आहे. कार्यक्रम आयोजीत करते वेळी सर्व नियोजन करूनच कार्यक्रम घ्यावा असे प्रतिपादन अन्न व औषधे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मूर्तिजापूर येथे आयोजीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वर्धापन दिनानिमित्त रमेशचंद्र राठी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार करताना केले.
             या सभागृहात अनेकांनी आपल्या तोंडावर मास्क घातलेला नाही. असा कार्यक्रम माझ्या जिल्ह्यात असता तर प्रत्येकी हजार रुपये दंड वसूल करुन घेतला असता. या कार्यक्रमात बरेच नियम पाळल्या गेले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोना लाट ओसरली असली तरी अजून कोरोना संपलेला नाही व तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरीकांनी सतर्कता बाळगून नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. नियम पाळलेतरच खऱ्याअर्थाने कोरोना मुकाबला करता येणे शक्य असल्याचे ना. शिंगणे म्हणाले. या रोगाची दहाकता वाढल्याने संपूर्ण देश बंद करवा लागला भविष्यात नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली. कोरोना काळात आशा वर्कर पुढे आल्या त्यामुळे त्यांचे राजेंद्र शिंगणे यांनी आवर्जून कौतुक केले त्याच बरोबर डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस, आशा वर्कर, व येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या सदस्यांचा कोरोना योद्धा म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी आमदार तुकाराम बिडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, सहकार नेते भैय्यासाहेब तिडके, आतिश महाजन, डॉ. आशा मिरगे, शिवा मोहोड, प्रदेश संघटक सचिव रवी राठी, महिला आघाडीच्या उज्ज्वला राऊत, नगरसेवक प्रशांत डाबेराव, निजाम इंजिनिअर, सदाशिव शेळके, इब्राहिम घाणिवाला, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे यांच्यासह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Activists should be aware of Corona rules - Rajendra Shingane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.