शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील तीन धार्मिक स्थळे हटविली; मनपाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 12:38 IST

अकोला : शहरातील ‘ओपन स्पेस’, शासकीय जागांवर २००९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांना हटविण्याच्या स्पष्ट सूचनांचे पालन करीत महापालिका प्रशासनाने शुक्रवारी कौलखेड परिसरातील दोन व गोरक्षण रोड परिसरातील तीन धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई केली.

ठळक मुद्दे सोमवारपर्यंत शासनाकडे अहवाल सादर करणे क्रमप्राप्त असल्यामुळे प्रशासनाने सदर धार्मिक स्थळे हटविण्याचा निर्णय घेतला. कौलखेड भागातील खेतान नगर, उन्नती नगर तसेच गोरक्षण रोड परिसरातील निवारा कॉलनीतील धार्मिक स्थळ हटविण्यात आले. यावेळी शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता.

अकोला : शहरातील ‘ओपन स्पेस’, शासकीय जागांवर २००९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांना हटविण्याच्या स्पष्ट सूचनांचे पालन करीत महापालिका प्रशासनाने शुक्रवारी कौलखेड परिसरातील दोन व गोरक्षण रोड परिसरातील तीन धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई केली. रणपिसे नगरमधील एका धार्मिक स्थळाला न्यायालयाचा स्थगनादेश असून, हा स्थगनादेश हटताच संबंधित धार्मिक स्थळ काढणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले.महापालिका क्षेत्रात २००९ नंतर प्रभागातील ओपन स्पेस, शासकीय जागांवर उभारलेल्या धार्मिक स्थळांना हटविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. मनपा प्रशासनाने २००९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांची यादी तयार केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई सुरू केली होती. याबाबतचा अहवाल राज्य शासनामार्फत उच्च न्यायालयाकडे सादर केला जातो. प्रशासनाने ५६ धार्मिक स्थळांची यादी तयार केली होती. त्यापैकी चार धार्मिक स्थळे हटविणे बाकी होते. या विषयावर येत्या सोमवारपर्यंत शासनाकडे अहवाल सादर करणे क्रमप्राप्त असल्यामुळे प्रशासनाने सदर धार्मिक स्थळे हटविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कौलखेड भागातील खेतान नगर, उन्नती नगर तसेच गोरक्षण रोड परिसरातील निवारा कॉलनीतील धार्मिक स्थळ हटविण्यात आले. ही कारवाई महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. कारवाईत मनपाच्या उपायुक्त डॉ. दीपाली भोसले, उपायुक्त अनिल बिडवे, नगररचनाकार विजय इखार, सहायक आयुक्त तथा दक्षिण झोन क्षेत्रीय अधिकारी पुनम काळंबे, खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले, रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ, सिव्हिल लाइनचे ठाणेदार वसंत मोरे, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, राजेंद्र टापरे, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर तसेच मनपा कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.महिलांना अश्रू अनावरमनपा प्रशासनाने कौलखेडस्थित खेतान नगरमधील धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईला पहाटे चार वाजता प्रारंभ केला. त्यावेळी आरती केल्याशिवाय मंदिराला हात लावू नका, अशी भूमिका नगरसेविका योगिता पावसाळे यांनी घेतली. कारवाई होत असताना परिसरातील महिलांना अश्रू अनावर झाले होते.नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढा!सर्वोच्च न्यायालय, राज्य शासनाचा दाखला देऊन धार्मिक स्थळे तातडीने काढली जातात. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेल्या प्रभागातील समस्या प्रशासन कधी निकाली काढणार, असा सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला.

अकोलेकर म्हणतात, आता बस झालं!सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत राज्य शासनाने धार्मिक स्थळांना जमीनदोस्त करण्याचा एककलमी कार्यक्रम आता बंद करावा, अशी मागणी अकोलेकर करीत आहेत. प्रभागांमधील ओपन स्पेसवर उभारलेल्या धार्मिक स्थळांमुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण न होता उलट सामाजिक एकोपा व सलोखा कायम राखण्यास मदत होत आहे. धार्मिक स्थळांमुळे ओपन स्पेसची दैनंदिन साफसफाई केली जाते. भाजपाच्या कार्यकाळात राज्यात सर्वाधिक धार्मिक स्थळे तोडण्याची कारवाई केवळ अकोला शहरात करण्यात आल्यामुळे अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका