शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 10:46 IST

वरिष्ठ स्तरावरूनच ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी २२ मार्चपासून ‘लॉकडाउन’ केल्यानंतर प्रत्येक जण घरात असताना या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कायम राहावे, यासाठी वरिष्ठ स्तरावरूनच ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.रस्त्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनोबल वाढविण्यासाठी रोजच मार्गदर्शन करण्यात येते तर नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये म्हणून त्यांनाही पोलिसांकडून भावनिक आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाचे गंभीर आणि मोठे संकट आल्यानंतरही काही नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अशा रिकामटेकड्यांवर कारवाई करण्यासाठी तसेच त्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर उभा आहे. याच कारणामुळे त्यांचा शेकडो नागरिकांशी रोज प्रत्यक्ष संपर्क येत आहे. अशातच मुंबई तसेच पुणे शहरातील काही पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पोलिसांचे मनोबल कमी होण्याची शक्यता होती; मात्र प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेल्या पोलीस बांधवांनी या गंभीर संकटाच्या काळातही त्यांचे मनोबल तीळभरही कमी न होऊ देता रस्त्यावर धीरगंभीर उभा आहे. पोलीस अधिकारीही त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे काम करीत आहेत. काही सामाजिक संघटनांनीही पोलिसांना सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून दिले आहेत. पोलीस प्रशासनही त्यांना या सुविधा पुरवित असून, याामुळे पोलीस आजही प्रत्य्ोकाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभा आहे.

पोलीस ठाण्यात ‘सॅनिटायझर रूम’पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाºयांसाठी तसेच प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर रूम तयार करण्यात आलेल्या आहेत. यामधून ये-जा केल्यानंतरच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाज सुरू करण्यात येत आहे.

‘सॅनिटायझर व्हॅन’ दिवस-रात्र रस्त्यावरशहरातील रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त देत असलेल्या पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागाची एक मोठी व्हॅन असून, यामध्ये सॅनिटायझर तसेच पोलिसांना आवश्यक असलेल्या काही बाबी ठेवण्यात आलेल्या आहेत.

अधिकाºयांचे मार्गदर्शनपोलीस अधिकारी व कर्मचारी रोज शेकडो नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यानंतर घरी जाऊन त्यांचा कुटुंबीयांसोबत संपर्क येतो; मात्र त्यांना कोरोना यापासून रोखण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, ‘सोशल डिस्टन्सिंग’ही पाळण्यात येते; राष्ट्रगीत घेण्यासाठी गोळा झालेल्या पोलिसांना त्याचवेळी मार्गदर्शन करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न पोलीस अधिकारी करतात.पोलीस अधिकारी व कर्मचाºयांसाठी खबरदारी म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत; मात्र त्यानंतरही पोलिसांना अनेक अडचणींचा सामना काही टवाळखोर नागरिकांमुळे करावा लागत आहे. कुणीही विनाकारण बाहेर पडू नका, अन्यथा आता पोलिसांना त्यांची कारवाई सुरू करावी लागेल.- सचिन कदम, शहर पोलीस उपअधीक्षक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस