शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वेतन १ तारखेला न झाल्यास कारवाई; शालेय शिक्षण विभागाने दिला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 11:16 IST

अकोला : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेलाच अदा करावे, असे निर्देश आधीच दिल्यानंतरही अनेक जिल्ह्यांमध्ये दिरंगाई केली जात आहे.

अकोला : शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेलाच अदा करावे, असे निर्देश आधीच दिल्यानंतरही अनेक जिल्ह्यांमध्ये दिरंगाई केली जात आहे. हा प्रकार न थांबल्यास १ तारखेला वेतन न झालेल्या शाळा, जिल्ह्यांची माहिती तातडीने सादर करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई प्रस्तावित करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने सर्व संबंधितांना २ आॅगस्ट रोजी दिला आहे. सोबतच मुस्लीम बांधवांचे बकरी ईद सणाच्या निमित्ताने वेतन कोणत्याही परिस्थितीत ५ आॅगस्टपर्यंत करण्याचेही बजावले आहे.राज्यातील शिक्षक, ग्रामसेवकांच्या वेतनाला कमालीचा विलंब होत असून, संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईचा फटका या दोन्ही संवर्गाला बसत आहे. त्यामुळे या संवर्गात प्रचंड नाराजी पसरलेली आहे. अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांवर कार्यरत शिक्षकांचा जून महिन्याचा पगार आजपर्यंतही झालेला नाही. शिक्षण विभाग, अर्थ विभागातील अधिकारी-कर्मचाºयांच्या बेपर्वाईचा फटका जिल्ह्यातील शिक्षकांना सहन करावा लागत आहे. जून-जुलै हा शाळा सुरू होण्याचा व लग्नसराईचा काळ होता. त्यातच मुलांच्या शाळांची फी, कुटुंबातील लग्नकार्य, खर्च प्रचंड असताना वेतनच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक पार हवालदिल झाले. शिक्षकांनी घेतलेले गृहकर्ज, वैयक्तिक, शैक्षणिक, वाहन कर्जाचे हप्ते कसे भरायचे, या काळजीनेही शिक्षकांची झोप उडाली. वेतनाच्या अनियमिततेमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य नाही. त्यामुळे जादा व्याजाचा भुर्दंडही भरावा लागत आहे. ही समस्या निकाली न निघाल्यास शिक्षकांना आर्थिक संकटातून मार्ग काढणे कठीण होणार आहे. या प्रकाराच्या तक्रारी राज्य शासनाकडेही झाल्या आहेत. एकीकडे गतिमान प्रशासन सुरू असताना कर्मचाºयांना वेतन मिळण्यास विलंब का होत आहे, यावरही प्रश्न निर्माण होत आहेत. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन दरमहा १ तारखेलाच द्यावे, तसे न झाल्यास याप्रकरणी जबाबदार सर्वच अधिकारी-कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित करावी, असे पत्र २ आॅगस्ट रोजी कक्ष अधिकारी रामदास धुमाळ यांनी दिले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक