शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळ तस्करांवरील कारवाईचे गौडबंगाल; स्थानिक अधिकारी व वन विभाग अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 13:45 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारी  रोजी काळ्याबाजारात दीड कोटी रुपये किंमत असलेल्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या  चौघांना अटक केली होती.

ठळक मुद्देदर्यापूर तालुक्यातील सामदा येथे धाड टाकून तस्करी करण्यात येत असलेला मांडूळ साप जप्त करून चार जणांना अटक केली होती. घटनास्थळ दर्यापूर तालुक्यातील सामदा दाखविले; मात्र सदर धाड चोहोट्टा बाजार येथे टाकण्यात आल्याचे यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाने सांगितले.धाड टाकणारे अधिकारी दोन दिवस वन विभागाच्या विश्रामगृहात मुक्कामी होते; मात्र याबाबत स्थानिक अधिकाºयांना पुसटशी कल्पनाही देण्यात आली नसल्याची चर्चा आहे.

अकोला : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारी  रोजी काळ्याबाजारात दीड कोटी रुपये किंमत असलेल्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या  चौघांना अटक केली होती; मात्र धाड टाकण्याचे ठिकाण व कारवाईबाबत गौडबंगाल निर्माण झाले असून, स्थानिक अधिकारी व वन विभागाला यापासून अनभिज्ञ ठेवण्यात आले. तसेच सदर प्रकरणाचा तपास वन विभागाकडे न देता थेट पोलिसांकडे देण्यात आल्याने संशय निर्माण होत असल्याची चर्चा आहे.मेळघाट टायगर सेलचे अधिकारी विशाल माळी यांनी दर्यापूर तालुक्यातील सामदा येथे धाड टाकून तस्करी करण्यात येत असलेला मांडूळ साप जप्त करून चार जणांना अटक केली होती. या अधिकाºयांकडून घटनास्थळ दर्यापूर तालुक्यातील सामदा दाखविले; मात्र सदर धाड चोहोट्टा बाजार येथे टाकण्यात आल्याचे यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाने सांगितले. त्यामुळे नेमके घटनास्थळ कोणते, असा संभ्रम निर्माण होत आहे. तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाने सदर कारवाई करताना वन विभागाच्या स्थानिक अधिकाºयांना अंधारात ठेवले. धाड टाकणारे अधिकारी दोन दिवस वन विभागाच्या विश्रामगृहात मुक्कामी होते; मात्र याबाबत स्थानिक अधिकाºयांना पुसटशी कल्पनाही देण्यात आली नसल्याची चर्चा आहे. चोहोट्टा बाजार येथे धाड टाकल्यानंतर येथील पेट्रोल पंपावर काम करणाºया एका कर्मचाºयाला ताब्यात घेतले. सदर पेट्रोल पंपाच्या मालकाने पोलिसांशी संपर्क साधून सदर कर्मचाºयाला का ताब्यात घेतले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे पेट्रोल पंपावर काम करणाºया युवकाला चुकीने ताब्यात घेतल्याचे लक्षात आल्यानंतर सोडण्यात आले.अमरावती जिल्ह्यातील कारवाईही संशयाच्या भोवऱ्यातअमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अधिकाºयांनी वाघ व बिबटची कातडी जप्त केल्याचे घोषित केले होते; मात्र सदर कातडी ही वाघाची नसून बनावट होती. तसेच सदर घटनास्थळ मध्य प्रदेशातील असल्यावरही मोर्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. वाघाच्या कातडी तस्करी प्रकरणात एका आरोपीला फरार दाखविण्यात आले होते; मात्र त्यानंतर या आरोपीचे मेडिकल करण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हा