एका वर्षात जिल्ह्यातील आठ कुंटणखान्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 02:43 PM2019-11-03T14:43:38+5:302019-11-03T14:43:43+5:30

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या या अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे.

Action against eight brothel houses in the district in one year | एका वर्षात जिल्ह्यातील आठ कुंटणखान्यांवर कारवाई

एका वर्षात जिल्ह्यातील आठ कुंटणखान्यांवर कारवाई

Next

अकोला : शहरासह जिल्ह्यातील आठ कुंटणखान्यांवर अकोला पोलीस प्रशासनाने कारवाई करीत सुमारे १९ युवती व महिलांची सुटका केली असून, १६ वर आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. जठारपेठ, बलोदे ले-आउट, मोठी उमरीतील इंजिनिअरिंग कॉलनी, देवराव बाबा चाळ, मलकापूर रोडवरील अंबिका नगर, जुने शहरातील पार्वती नगरसारख्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या या अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे.
कौटुंबिक परिस्थिती, हायफाय शौक पूर्ण करण्यासाठी मजबुरी तसेच ब्लॅकमेलिंग या विविध कारणांमुळे वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या युवतींवर दबाव टाकून हा व्यवसाय करण्यात येत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मलकापूर रोडवरील अंबिका नगरमध्ये एका शिक्षकाच्या घरातच सुरू असलेल्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यानंतर येवता येथील एका घरात असलेल्या दोन युवती या नागपूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले असून, तेथील एजंटद्वारे त्यांना अकोल्यात पाठविण्यात आले होते, तर जठारपेठेतील ज्योती नगरातील कुंटणखान्यामध्ये तीन युवतींना ताब्यात घेण्यात आले होते. यासोबतच समता कॉलनीत एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यातील तीन महिला केवळ कौटुंबिक परिस्थिती व उदरनिर्वाहासाठी या व्यवसायात ओढल्या गेल्याची माहिती आहे. डाबकी रोडवर आढळलेली पीडित युवती मात्र शौकाखातर या व्यवसायात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. देवराव बाबा चाळीमध्ये एका घरातून अटक केलेल्या दोन मुलीही केवळ त्यांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी या धंद्यात उतरल्या होत्या. मोठी उमरीतील इंजिनिअरिंग कॉलनीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर तर थक्क करणारी माहिती समोर आली असून, या ठिकाणावर महाविद्यालयातील तरुणीच मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर विशेष पथकाने बलोदे ले-आउटमधील आरोग्य नगरमध्ये केलेल्या कारवाईत तीन मुली व महिला या कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच वैयक्तिक आयुष्य मजेत जगण्यासाठी हा व्यवसाय करीत असल्याची माहिती उघड झाली आहे.

 

Web Title: Action against eight brothel houses in the district in one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.