अकोला: वर्धा शहरातून एका चिमुकल्या मुलाचे अपहरण करून आरोपी अकोल्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणातील एका आरोपीने जेल चौकातील एटीएममधून पैसे काढल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. सोमवारी दुपारी अकोला पोलिसांना वर्धा शहरातील राहुल नामक चिमुकल्या मुलाचे काही अज्ञात आरोपींनी अपहरण केले आणि हे आरोपी मुलाला घेऊन एमएच ३४ एडी १२२५ क्रमांकाच्या मोटारसायकलने अकोल्यात आल्याचे कळले. पोलिसांनी हा संदेश तातडीने सर्वच पोलिस ठाण्यापर्यंंंत पोहोचविला. आरोपी अकोला शहरात फिरत असून, त्यातील एका आरोपीने जेल चौकातील एटीएममधून पैसेसुद्धा काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी यंत्रणा कामाला लावून आरोपींचा व मोटारसायकलचा शोध घेतला.
वर्धेतून मुलाचे अपहरण केलेला आरोपी अकोल्यात
By admin | Updated: July 15, 2014 00:52 IST