हुंडीवाले हत्याकांडातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 03:06 PM2020-01-19T15:06:15+5:302020-01-19T15:06:20+5:30

सूरज गावडेंचा जामीन अर्ज मागे घ्यावा किंवा तो फेटाळण्यात येईल, अशा सूचना करताच आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला.

The accused in the Hundiwale massacre was rejected | हुंडीवाले हत्याकांडातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

हुंडीवाले हत्याकांडातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

googlenewsNext

अकोला : अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी सूरज प्रल्हाद गावंडे याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेताच खंडपीठाने आरोपी सूरज गावडेंचा जामीन अर्ज मागे घ्यावा किंवा तो फेटाळण्यात येईल, अशा सूचना करताच आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला.
स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार, ६ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहिरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे व मोहम्मद साबीर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद साबीर हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तर श्रीराम कसदन गावंडे या आरोपीस तब्बल एक वर्षापर्यंत न्यायालयासमोर जामीन अर्ज करण्यास मनाई केली आहे. तर आता नागपूर खंडपीठात सूरज प्रल्हाद गावंडे या आरोपीला जामीन देण्यात यावा यासाठी अ‍ॅड. अनिल मार्डीकर यांनी अर्ज दाखल केला होता; मात्र सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. व्ही. ए. ठाकरे यांनी युक्तिवाद केल्यानंतर नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी सदरचा अर्ज मागे घ्यावा किंवा तो फेटाळण्यात येईल, अशी सूचना करताच आरोपीच्या वकिलांनी सूरज गावंडे याचा जामीन अर्ज मागे घेतला.

 

Web Title: The accused in the Hundiwale massacre was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.