शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भूखंड घोटाळय़ात झांबड पिता-पुत्र आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 1:47 AM

अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांच्या  भूखंड घोटाळय़ात ‘तो मी नव्हेच!’ असे भासविणरा दीपक कृषी  सेवा केंद्राचा संचालक दीपक रमेश झांबड व त्यांचे पिता रमेश  गजराज झांबड या पिता-पुत्रास आर्थिक गुन्हे शाखेने सखोल त पास केल्यानंतर समोर आलेल्या सबळ पुराव्यावरून सोमवारी  मुख्य आरोपी केले आहे. 

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेने केला तपास दीपक व रमेश झांबडचा समावेश

प्रभाव लोकमतचासचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांच्या  भूखंड घोटाळय़ात ‘तो मी नव्हेच!’ असे भासविणरा दीपक कृषी  सेवा केंद्राचा संचालक दीपक रमेश झांबड व त्यांचे पिता रमेश  गजराज झांबड या पिता-पुत्रास आर्थिक गुन्हे शाखेने सखोल त पास केल्यानंतर समोर आलेल्या सबळ पुराव्यावरून सोमवारी  मुख्य आरोपी केले आहे. अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट  नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड  शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं.  १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून, तब्बल २0 कोटी रुपये  किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलि िखत दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील  अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल  मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन, हा भू खंड कागदोपत्री हडपण्यात आला. हे प्रकरण ‘लोकमत’ने  चव्हाट्यावर आणले. तसेच पाठपुरावा केला. याप्रकरणी सिटी  कोतवाली पोलीस ठाण्यात अमर डिकाव यांनी तक्रार दिली; मात्र  काही दिवसांत तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर त्यांनी  तपास पूर्ण करून भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश  कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात  भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी-कर्मचारी व हा भूखंड हड प करणारा २0 कोटी रुपयांचा लाभार्थी यांच्याविरुद्ध भारतीय  दंड विधानाच्या कलम ४२0, ४६७, ४६८, ४७१, १२0 ब,  आयटी अँक्ट कलम ६५ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानं तर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी सखोल तपास  केला असता, यामध्ये भूखंड ज्या गजराज गुदडमल  मारवाडीच्या (झांबड) नावावर आहे, तो घोटाळा करण्यासाठी  दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड या दोघांनी हा सर्व  कट रचल्याचे समोर आले. भूमी अभिलेख विभागातील काही  दस्तावेज व तपासणी तसेच काहींच्या बयानातून झांबड पिता- पुत्राने हा घोटाळा केल्याचे समोर येताच आर्थिक गुन्हे शाखेने या  दोघांनाही सदर प्रकरणात आरोपी केले आहे.

लोकमतच्या पाठपुराव्यानंतर झाली कारवाईलोकमतने सदर प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर तीन  कर्मचार्‍यांना निलंबित केले. एका कर्मचार्‍याची विभागीय  चौकशी सुरू आहे, तर शिवाजी काळे यांच्यावर निलंबनाची  टांगती तलवार आहे. भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा  अधीक्षक अजय कुळकर्णी व उपअधीक्षक योगेश कुळकर्णी  यांच्यावरही या प्रकरणात दिरंगाईचा ठपका ठेवण्यात आला  असून, दीपक झांबड व रमेश झांबड या दोघांना भूखंड  घोटाळय़ात आरोपी करण्यात आले आहे.

जामीन अर्जावर सुनावणी ४ नोव्हेंबरलाशासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ात  आरोपी असलेला दीपक झांबड व रमेश झांबड या दोघांनीही  अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली  आहे. या दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ४ नोव्हेंबर रोजी  सुनावणी ठेवण्यात आली असून, तत्पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेचा  ‘से’ मागविण्यात आला आहे. हा ‘से’ दाखल झाल्यानंतर  झांबड पिता-पुत्राच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

आणखी आरोपी येणार समोरभूखंड घोटाळय़ात आणखी काही आरोपी समोर येणार  असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यामध्ये  त्यावेळी निलंबित असलेल्या एका कर्मचार्‍याचा व त्याचा खास  साथीदार नगरसेविकेचा पती या दोघांचीही मुख्य भूमिका  असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर प्रकरणात  भूमी अभिलेख विभागातील काही कर्मचार्‍यांसह भूखंड  घोटाळय़ात सहभागी असलेल्या आणखी काही जणांची नावे  समोर येणार आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा