वाडेगाव (अकोला): श्री. क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणा-या भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ४.१५ वाजता घडलेल्या या अपघातात चार भाविक ठार, तर तीन गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी वाशिम जिल्ह्यातील उमरा कापसे या गावातील १७० भाविकांची पायदळ दिंडी शेगाव येथे जाण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी निघाली. या दिंडीसोबत एक मालवाहू वाहनही होते. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी ही दिंडी अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यावर आली. यावेळी मागून आलेल्या आर. जे. १३ जी. सी. ०७८२ क्रमांकाच्या ट्रकने पायदळ दिंडीसोबत असलेल्या एम. एच. ३७ बी. ३६८ क्रमांकाच्या तीन चाकी वाहनास धडक दिली. यावेळी या वाहनात ९ वारकरी बसलेले होते. धडक दिल्यामुळे भाविकांचे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले; परंतु, वाहनातील भाविक रस्त्यावरच पडले. धडक दिल्याने अनियंत्रीत झालेला ट्रक या भाविकांच्या अंगावर उलटला. ट्रकमधील सरकीच्या पोत्यांखाली दबल्याने चार भाविक जागीच ठार झाले, तर तीन गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये काशीनाथ चंद्रभान कापसे, रमेश धनाजी कापसे, लिला कापसे, रामजी काकडे ( सर्व रा. उमरा-कापसे ) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये सरजूबाई कापसे, लोडबाई बळीराम कापसे व आणखी एका मुलीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच वाडेगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन दबलेल्या भाविकांना बाहेर काढले. बाळापूर पोलिसांनीही घटनास्थळाला भेट देऊन जखमींना उपचारासाठी हलविले.
शेगावला निघालेल्या वाशिम जिल्ह्यातील वारकऱ्यांवर काळाचा घाला; भरधाव ट्रकच्या धडकेत चार ठार, तीन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:00 IST
वाडेगाव (अकोला): श्री. क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणाºया भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ४.१५ वाजता घडलेल्या या अपघातात चार भाविक ठार, तर तीन गंभीर जखमी झाले.
शेगावला निघालेल्या वाशिम जिल्ह्यातील वारकऱ्यांवर काळाचा घाला; भरधाव ट्रकच्या धडकेत चार ठार, तीन गंभीर
ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील बाळापूर -पातूर रस्त्यावरील बाघ फाट्यावर सायंकाळी ४ वाजताचे सुमारास घडली घटनाप्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील उमरा कापसे येथून शेगाव येथे जात होती पायदळ दिंडी ट्रकमधील सरकीच्या पोत्यांखाली दबल्याने चार भाविक जागीच ठार झाले. तर तीन गंभीर जखमी झाले.