शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंचा बोरगांव मंजू जवळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 19:27 IST

जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देअंकुर आदिवासी निवासी आश्रम शाळेचा संघ अमरावती येथील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आला होता. बोरगाव मंजूनजीक त्यांच्या एम.एच.१५ जी. आर. ९९५८ क्रमाांकाच्या गाडीला विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली.

अकोला : अमरावती येथे राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेल्या नाशिक येथील संघाच्या वाहनाला बोरगाव मंजूनजीक अपघात झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अपघातात संघातील सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथे गुरुवार २८ नोव्हेंबर पासून राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पधेत सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अलंगुन येथील अंकुर आदिवासी निवासी आश्रम शाळेचा संघ एम.एच.१५ जी. आर. ९९५८ क्रमांकाच्या गाडीने अमरावती येथे जात होता. मात्र, बुधवारी सायंकाळी बोरगाव मंजुनजीक ट्रकने संघाच्या वाहनाला जबर धडक दिली. घटनेत संघातील ६ जण गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरीष गवळी यांनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमींना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. गाडीत एकूण १३ जण असून, उर्वरीत खेडाळू किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर बोरगाव मंजू येथेच प्राथमिक उपचार करण्यात आला. अपघातात तुकाराम गावीत, महेश पवार, कल्पेश सहारे, प्रभाकर धूम , रोशन गायकवाड, सुरेश गावीत हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाNashikनाशिकAccidentअपघात