शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकडे जाणार्‍या रुग्णवाहिकेला अपघात; आगर गावावर शोककळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 20:21 IST

नागपूर येथे जात असलेल्या रुग्णवाहिकेला टॅँकरने धडक दिल्याने चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. या घटनेत आगरच्या तिघांचा समावेश आहे. तिन्ही मजुरांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. 

ठळक मुद्देतिघांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कआगर (अकोला): नागपूर येथे घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला टॅँकरने धडक दिल्याने चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. या घटनेत आगरच्या तिघांचा समावेश आहे. तिन्ही मजुरांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आगर येथील मजूर परिसरातील गावांमध्ये ऑटोने कपाशी वेचण्यासाठी जातात. रविवारी गावातील काही मजूर खांबोरा येथील भरणे यांच्या शेतात कपाशी वेचण्यासाठी गेले होते. सायंकाळी परत येत असताना त्यांच्या ऑटोला टॅक्टरने धडक दिली. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले होते. या सर्व जखमींना अकोला सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींपैकी दोघांना पुढील उपचारार्थ नागपूर येथे रुग्णवाहिकेने रविवारी रात्री हलवण्यात आले. त्यांच्याबरोबर काही नातेवाईकही होते. यातील चौघांसाठी ही रात्र शेवटची ठरली.  

भालेराव कुटुंबावर काळाची झडप आपल्या आजीबरोबर कपाशी वेचण्यासाठी गेलेला आकाश भालेराव हा अपघातात जखमी झाला होता. त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेण्यात येत होते. त्याच्याबरोबर त्याची आईही रुग्णवाहिकेने जात होती. या रुग्णवाहिकेला अपघात झाल्याने आकाश भालेराव व त्याच्या आईचा मृत्यू झाला, तर त्याची आजी अकोला येथे उपचार घेत आहे. या घटनेतून त्याचे वडील मात्र सुदैवाने बचावले. 

वह्या, पुस्तके घेण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण दैनंदिन खर्च भागवण्यासाठी दररोज मजुरी करावी लागणार्‍या भालेराव कुटुंबाला मुलांच्या शिक्षणाचा खर्चही पेलवत नव्हता. त्यामुळे वह्या, पुस्तके घेण्यासाठी रविवारी सुटीचा दिवस असल्याने तो आपल्या आजीबरोबर कपाशी वेचण्यासाठी गेला होता. सातव्या वर्गात शिकणार्‍या आकाशला वह्या, पुस्तकांसाठी कापूस वेचणे जीवावर बेतले. अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने त्याचे वह्या, पुस्तके घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAccidentअपघात