शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात युरिया, डीएपी खताचा मुबलक साठा; आतापर्यंत ६,४११ मे.टन युरिया, १,०८७ डीएपी खताचा पुरवठा

By रवी दामोदर | Updated: June 8, 2024 15:42 IST

खरीप हंगाममाकरिता जिल्ह्यात महिनानिहाय रासायनिक खताचा पुरवठा करण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून खत उत्पादक कंपन्यांना ८८ हजार ७०० मे.टन आवंटन वितरित करून देण्यात आलेले आहे.

अकोला : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, काही ठिकाणी शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासविली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यात युरिया, डीएपी खताचा मुबलक साठा असल्याची माहिती दिली असून, खतांची कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. खरीप हंगाममाकरिता जिल्ह्यात महिनानिहाय रासायनिक खताचा पुरवठा करण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून खत उत्पादक कंपन्यांना ८८ हजार ७०० मे.टन आवंटन वितरित करून देण्यात आलेले आहे.

यामध्ये युरिया खताचे १८ हजार ७०० मे.टन व डीएपी १५ हजार ५०० मे.टन आवंटन देण्यात आलेले आहे. त्यानुसार उत्पादक कंपन्यांना दि. ३१ मेअखेर जिल्ह्याकरिता एकूण १ हजार ४९६ मे.टन युरिया व डीएपी ७७५ मे.टन खताचा पुरवठा करावयाचा होता. त्यानुसार खत उत्पादक कंपन्यांकडून जिल्ह्याकरिता दि. ५ जूनअखेर ६ हजार ४११ मे.टन युरिया व डीएपी १ हजार ०८७ मे.टन खताचा पुरवठा केलेला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ९ हजार ६४८ मे.टन युरिया व डीएपी २ हजार ७८१ मे.टन खताचा शिल्लक साठा आहे. तसेच पुढील आठवड्यात २ हजार ६०० मे.टन युरियाचा व ३००० मे.टन डीएपीचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आवश्यक त्या खताचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

‘त्या’ कृषी सेवा केंद्रांवर होणार कारवाई -

कृषी सेवा केंद्रातून आवश्यकतेनुसार युरिया व डीएपी खत शेतकऱ्यांनी खरेदी करावे. विक्रेत्यांकडे खत उपलब्ध असूनही ते विक्री करण्यास नकार देत असल्यास किंवा जादा दराने विक्री करीत असल्यास त्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई होणार आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तालुक्यातील कृषी अधिकारी, पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी लागणार आहे.

जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा आहे. काही भागात टंचाई असल्यास तेथे दोन दिवसांत पुन्हा खताचा पुरवठा होणार आहे; परंतु खताची कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांची फसवणूक, लूट होत असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती; तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे करावी.- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

टॅग्स :FertilizerखतेFarmerशेतकरी