शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
5
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
6
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
7
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
8
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
9
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
10
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
11
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
12
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
13
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
14
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
15
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
16
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
17
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
18
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
19
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
20
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक

११० रुपयांत गणवेश शिवून देणाऱ्याच्या शोधात शिक्षक? विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच देण्याची पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

By नितिन गव्हाळे | Updated: June 17, 2024 22:41 IST

अकोला: शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेबाबतशिक्षक व पालकांनी केलेल्या सुचनांचा विचार करून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच मिळावा अथवा ...

अकोला: शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेबाबतशिक्षक व पालकांनी केलेल्या सुचनांचा विचार करून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच मिळावा अथवा शिलाई अनूदान वाढवून मिळावे अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सन २०२४-२५ मध्ये सर्व विद्यार्थ्यांना गणवेश कापड वाटपाचे आदेश आहेत. त्यामुळे गणवेश शिलाई आता स्थानिक स्तरावरून करावी लागणार आहे. याबाबत राज्यातील शिक्षक व पालकांनी संघटनेकडे काही सुचना मांडल्या आहेत. त्या पुढील सूचनांचे निवेदन संघटनेने शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त, राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक (प्रशासन) प्राथमिक शिक्षण परिषद पुणे यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना सत्रारंभी दोन्ही पूर्ण तयारच गणवेश शासनाकडून मिळावेत. एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत राज्यस्तरावरून एका गणवेशासाठी कापड देण्याचे नियोजन आहे व स्थानिक स्तरावर शाळा समितीने गणवेश शिलाई करून द्यावी असे दि. १८ ऑक्टोंबर २०२३ व ५ जून २०२४ च्या शासननिर्णयाने आदेशित करण्यात आले आहे.११० रूपयांमध्ये बचतगटसुद्धा शिलाईस इच्छुक नाहीत!शासनाने शिलाईसाठी दिलेली ११० रूपये ही रक्कम अत्यंत कमी असल्याने स्थानिक बचत गट शालेय गणवेश शिलाई करून देण्यास तयार नाहीत. त्यामुळे शासनाच्या वतीने फक्त गणवेश कापड न पुरवता रेडिमेड गणवेशाचा पुरवठा करावा, अथवा शिलाईसाठी रक्कम वाढवून द्यावी. अशी मागणी राज्य नेते विजय भोगेकर, शारदा वाडकर,राज्य प्रतिनिधी प्रशांत शेवतकर, जिल्हा नेते प्रशांत भारसाकळे, जिल्हाध्यक्ष संघर्ष सावरकर, कार्याध्यक्ष अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष विजय वाकोडे, उपाध्यक्ष प्रविण डेरे, मो.अनवर, महीला जिल्हाध्यक्षा हेमलता चव्हाण, सरचिटणीस स्वप्नाली शेळके यांनी निवेदनातून केली आहे . 

टॅग्स :Schoolशाळा