शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’चे शक्तीप्रदर्शन; प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी दाखल! अकोला शहरात काढली रॅली

By संतोष येलकर | Updated: April 4, 2024 17:31 IST

अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश  बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवार, ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.

संतोष येलकर,अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश  बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवार, ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरात काढण्यात आलेल्या रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केल्यानंतर निवडणुकीत विजयाचा निर्धार करण्यात आला.

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी अकोला शहरातील टाॅवरस्थित वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयापासून रॅली काढण्यात आली. टाॅवर चौक, फतेह चौक, खुले नाट्यगृह चौक, पंचायत समितीसमोरून मार्गक्रमण करीत रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी डाॅ. हर्षवर्धन मालोकार, पक्षाचे शहर अध्यक्ष मजहर अली, बालमुकुंद भिरड, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, बळीराम चिकटे, अमर डिकाव, गजानन दांडगे, सिद्धार्थ सिरसाट, माजी सभापती आकाश शिरसाट, प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव आदी उपस्थित होते.

रॅलीत उसळली गर्दी !

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शहरात काढण्यात आलेल्या रॅलीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह पक्षाच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, अ‍ॅड. संतोष राहाटे, गजानन गवई, डाॅ. संतोष हुशे, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे आदींसह पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

विजय खेचून आणण्याची जिद्द बाळगूया : प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीत मतांच्या स्वरुपात क्रिया करायची आहे. त्यासाठी ‘इलेक्शन मोड ’ मध्ये येऊन काम करण्याचा सल्ला अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. मतदारांना मतदान बूथपर्यंत घेऊन जाण्याचे सांगत निवडणुकीत विजय खेचून आणण्याची जिद्द बाळगूया, असा निर्धारही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

अकोल्याच्या विकासासाठी ही निवडणूक महत्वाची : सुजात आंबेडकर

संविधान आणि लोकशाही वाचविण्यासोबतच अकोला शहराच्या विकासासाठी ही लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. त्यानुषंगाने ही निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार करण्याचे आवाहन पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४