शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंडाला मध्यप्रदेशातून शिताफीने केली अटक

By आशीष गावंडे | Updated: July 5, 2024 20:48 IST

दराेडा प्रकरण; ‘एलसीबी’ची धाडसी कारवाइ

अकाेला: शहरातील उद्याेजक केडिया यांच्या निवासस्थानी घातलेल्या दराेडा प्रकरणी चाैथा आराेपी व २१ पेक्षा अधिक गंभीरस्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातून बेड्या ठाेकल्या.  

हेमंत पुनमचंद लुनिया (४८)रा. नावदा ता.महू जि. इंदौर असे अटक केलेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. न्यू आळशी प्लाॅटमधील उद्याेजक नवलकिशाेर केडिया यांच्या निवासस्थानी रात्री १० च्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या चार ते पाच इसमांनी घरात शिरकाव करुन लुटमार केल्याची घटना २७ जून राेजी घडली हाेती. जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनास्थळावर जाऊन केडिया कुटुंबियांची विचारपूस केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांना तपासकामी पथके रवाना करण्याचे निर्देश दिले हाेते. २ जुलै राेजी स्थानिक गुन्हे शाखा व खदान पाेलिसांच्या संयुक्त कारवाइत प्रकरणाचा मास्टर माइंड पुष्पराज शाहा याला सुरतमधून व सचिन शाहा, विनायक देवरे या दाेन जणांना नाशिक येथून अटक करण्यात आली हाेती. इतर तीन फरार आराेपींचा शाेध घेण्यासाठी ‘एलसीबी’ची पथके रवाना झाली हाेती.  

लुनियाविराेधात गंभीर स्वरुपाचे गुन्हेजिल्हा पाेलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्यप्रदेशकडे रवाना झाले हाेते. लुनिया विराेधात मध्यप्रदेशात खुन करणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, डेपोतून डिझेल चोरी, अवैधरित्या दारू विक्री, पॅरोल वरून फरार राहणे असे गंभीर स्वरूपाचे एकुण २१ गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एमपी-०९-झेड एम-८४६८ जप्त करण्यात आली असून आरोपीला खदान पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

नाशिकमध्ये दराेड्याचा कटकुख्यात गुंड लुनिया व त्याच्या साथीदारांनी १० जून राेजी इंदाैर परिसरातील मुंबई ते दिल्ली (भारत पेट्रोलीयम)ची पाईप लाईन फोडून त्यातून मोठ्या प्रमाणात डिझेलची चोरी केली हाेती. याप्रकरणी ताे फरार होवून नाशिक येथे आला होता. येथेच केडिया यांच्या घरी दरोड्याचा कट आखण्यात आल्याची माहिती आहे. यादरम्यान, केडिया प्रकरणी तीन जणांना अटक झाल्याचे समजताच गुंड लुनिया त्याचे दोन्ही मोबाईल बंद करून फरार झाला होता. त्यामुळे त्याला शाेधून काढण्याचे ‘एलसीबी’समाेर आव्हान ठाकले हाेते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला