शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बाजाराला लागली भीषण आग, आगीत आठ ते दहा दुकाने जळून खाक 

By सचिन राऊत | Updated: November 10, 2023 19:44 IST

या घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाने तातडीने पाण्याच्या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

अकोला : शास्त्री स्टेडियममध्ये असलेल्या भंगार बाजारातील काही दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या आगीत भंगार बाजारातील सात ते आठ दुकाने जळून खाक झाली असून त्यामधील सुमारे दहा लाख रुपयापेक्षा अधिक मुद्देमाल जळाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाने तातडीने पाण्याच्या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

शास्त्री स्टेडियममध्ये नीता गेस्ट हाऊस समोर भंगार बाजार असून या भंगार बाजारातील प्लास्टिक व इतर साहित्याला शुक्रवारी पहाटे आग लागली. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याआगीत भंगार बाजारातील आठ ते दहा दुकाने जळून खाक झाली असून यामधील लाखो रुपयांचे मुद्देमाल नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाद्वारे तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. महसूल विभागाकडूनही नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे.

मोठी हानी टळली शास्त्री स्टेडियममध्ये असलेल्या भंगार बाजारात मोठी आग लागली होती. या स्टेडियमच्या मैदानात फटाका बाजार असून काही अंतरावरच असलेल्या फटाका बाजाराला या आगीची झळ लागली असती तर मोठ्या प्रमाणात हानी झाली असती अशी माहिती घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिली; मात्र सुदैवाने आगीवर तातडीने नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळल्याची माहिती आहे. 

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दल