शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी ९.५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 13:54 IST

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी राज्य शासनाने तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला शहरातील पोलिसांच्या निवासस्थानांसह तालुका व ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी राज्य शासनाने तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तब्बल २४७ पोलीस निवासस्थान लवकरच चकाचक होणार आहेत.राज्य शासनाने निवासस्थान दुरुस्तीसाठी ९ कोटी २० लाख ३७ हजार ६९९ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून अकोला शहरातील १९ पोलीस अधिकाºयांच्या निवासस्थानांची दुरुस्ती होणार आहे. त्यानंतर शहरातीलच १३७ पोलीस कर्मचारी सेवा निवासस्थानांची दुरुस्ती होणार आहे. त्यानंतर पातूर येथील शिपाई दल सेवा निवासस्थानाची दुरुस्ती, मूर्तिजापूर येथील दोन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांसाठीचे निवासस्थान दुरुस्ती, दोन सहायक पोलीस निरीक्षक आणि पाच पोलीस हवालदार, सहा पोलीस शिपाई आणि आणखी आठ पोलीस शिपायांच्या निवासस्थानांची या निधीतून दुरुस्ती होणार आहे.बार्शीटाकळी येथील सहा अविवाहित पोलीस शिपायांच्या निवासस्थानांची दुरुस्ती होणार आहे. यासोबतच पिंजर येथील १२ पोलीस कर्मचारी, तेल्हारा येथील आठ पोलीस कर्मचारी, हिवरखेड येथील १३ पोलीस कर्मचारी आणि अकोट येथील २८ पोलीस कर्मचाºयांच्या निवासस्थानांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.या दुरुस्तीमध्ये ही निवासस्थाने चकाचक करण्यात येणार असून, निधी प्राप्त होताच या निवासस्थान दुरुस्तीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू होणार आहे. या निवासस्थान दुरुस्तीसाठी १० कोटी ४१ लाख २६ हजार ८४४ रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यापैकी ९ कोटी २० लाख ३७ हजार ६९९ रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या निवासस्थानासाठी चांगली सुविधा असावी म्हणून त्यांचे निवासस्थान दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार करून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. शासनाने २४७ निवासस्थानांची दुरुस्तीसाठी मंजुरी दिल्याने अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना सुविधा मिळणार आहेत. यासोबतच सुमारे ४०० निवासस्थान नव्याने बांधण्यात येत असून, पोलिसांना या ठिकाणी चांगली घरे मिळणार आहेत.- एम. राकेश कलासागर,पोलीस अधीक्षक, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस