८४ खेडी योजना दुरुस्तीचे साहित्य गायब; मजीप्राने गिळले मूग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 03:52 PM2019-01-18T15:52:18+5:302019-01-18T15:52:24+5:30

अकोला : खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी देण्यासाठी १० कोटींपेक्षाही अधिक रक्कम खर्च झाली. दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खरेदी केलेले साहित्य गायब झाल्याने ७७ लाखांपेक्षाही अधिक रकमेचा अपहार झाला.

 84 villages water suply scheme; repairing tools missing | ८४ खेडी योजना दुरुस्तीचे साहित्य गायब; मजीप्राने गिळले मूग 

८४ खेडी योजना दुरुस्तीचे साहित्य गायब; मजीप्राने गिळले मूग 

googlenewsNext

अकोला : खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी देण्यासाठी १० कोटींपेक्षाही अधिक रक्कम खर्च झाली. दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खरेदी केलेले साहित्य गायब झाल्याने ७७ लाखांपेक्षाही अधिक रकमेचा अपहार झाला. तरीही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. ही बाब आता योजना हस्तांतरण करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणसह संबंधितांच्या गळ्यात पडणार आहे. विशेष म्हणजे, गत वर्षभरापासून या अपहाराबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मूग गिळून असल्याने त्यांचाही या प्रकरणाशी असलेला संबंध तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खरेदी करून पुरवठा केलेल्या पाइपपैकी ४६६५ मीटर (४.६ किमी) पाइपची योजनेतील गावांसाठी जोडणीच झालेली नाही. त्याचवेळी खरेदी केलेले हे पाइप कुठे आहेत, याची माहितीही प्राधिकरणाकडे नाही. या पाइपची किंमत ३२ लाखांपेक्षाही अधिक आहे. एअर शॉफ्टसाठी १०० एमएसटीची खरेदी केली. त्यापैकी ७२ वापरल्या गेल्या. २८ एमएसटी गायब करण्यात आल्या आहेत. त्याची किंमतही लाखोंच्या घरात आहे. एअर व्हॉल्व्ह १५० पैकी ७२ चा वापर झाला. ७८ व्हॉल्व्हचा हिशेब नाही. संतुलन टाकीस अतिरिक्त आउटलेट लावण्यासाठी ३३६ ठिकाणी काम केल्याचे सांगितले; मात्र ते कुठे झाले, याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. चेंबरचे बांधकाम केल्याची नोंद नाही, तरीही १ लाख १९ हजारांचे देयक काढण्यात आले. २५ सीआयडीएफ स्युल्स व्हॉल्व्हपैकी सात ठिकाणी बसविण्यात आले. १८ व्हॉल्व्ह रिप्लेस केले. ते व्हॉल्व्हही गायब आहेत. गळती दुरुस्ती करण्यासाठी एलआरसी पुरवठा करण्यात आला. मोजमाप पुस्तिकेत दुरुस्तीची नोंद असली, तरी त्या नेमक्या कुठे वापरण्यात आल्या, ही बाबही उघड झालेली नाही. डीआय स्पेशल १५४०० किलोग्रॅम खरेदी झाली. त्यापैकी १२६६७ किलोचा वापर झाला. उर्वरित २७३३ किग्रॅ कुठे आहेत, ही बाब कंत्राटदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधितांकडूनच घ्यावी लागणार आहे. सीआयडी जॉइंटसाठी १३ लाख २८ हजार रुपये तर ६८७ ठिकाणी गळती दुरुस्तीसाठी ८ लाख ९६ हजार रुपये काढण्यात आले. ही कामे एकाच दिवशी केल्याची माहिती आहे. साहित्य पुरवठ्याची साठा पुस्तकात नोंद नाही, तसेच कामे कोणत्या ठिकाणी केली, याचीही माहिती उपलब्ध नसल्याने ८४ खेडी योजनेची दुरुस्ती केली की निधी उकळण्यासाठी कामे झाली, हा मोठा प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होत आहे.

 

Web Title:  84 villages water suply scheme; repairing tools missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला