शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

‘मैत्रेय’मध्ये अकोला जिल्ह्यातील ८२ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:50 IST

अकोला: राज्यभरातील लाखो नागरिकांना पैसे दुपटीचे आमिष देणाऱ्या मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अकोला जिल्ह्यातील तब्बल ८२ हजारावर अधिक गुंतवणूकदारांची तब्बल ५३ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती आता समोर आली आहे.

अकोला: राज्यभरातील लाखो नागरिकांना पैसे दुपटीचे आमिष देणाऱ्या मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अकोला जिल्ह्यातील तब्बल ८२ हजारावर अधिक गुंतवणूकदारांची तब्बल ५३ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक झालेल्यांनी मोबदला मिळण्यासाठी आता पुन्हा कुणाच्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.मैत्रेय कंपनीने विविध प्रलोभने दाखवून कोटयवधी रुपये गोळा केले होते. गुंतवणुकदारांसाठी दलालांची मोठी साखळीच या कंपनीने जिल्ह्यात तयार केली होती. गुंतवणुकीवर मोठा परतावा तसेच हॉटेल, प्लॉटमध्ये मालकी हक्काचे प्रलोभन दाखवत मैत्रेयच्या संचालकांनी विविध १४ कंपन्यांच्या माध्यमातून देशभरातील लाखो गुंतवणूकदारांकडून रकमा स्वीकारल्या होत्या; परंतु त्याचा परतावा दिला नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तक्रारी झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत. आजपर्यंत पोलिसांकडे फसवणूक झालेल्या अडीच हजार गुंतवणुकदारांनी धाव घेतली. तर जिल्ह्यातील एकूण ८२ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या ८२ हजार गुंतवणूकदारांकडून मैत्रेयने तब्बल ५३ कोटी रुपये लुबाडल्याचे पोलीस तपासात समोर आला आहे. मैत्रेयच्या संचालकांवर राज्यात तसेच देशभरात विविध ठिकाणी सुमारे ३० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मैत्रेय घोटाळा व त्याच्या परताव्याची दखल घेत राज्य शासनाकडे राज्य पातळीवर ३० जिल्ह्यातील तपास अधिकाºयांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने मैत्रेयच्या राज्य, देशातील विविध ठिकाणी तसेच परदेशातील मालमत्तांचा शोध घेऊन त्याला सील ठोकले आहेत. या मालमत्तांचे शासकीय दरानुसार मूल्यांकन केले आहे. आता त्याचे बाजारभावानुसार मूल्यांकन तयार करून त्यांच्या प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतरच गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार असल्याची एक आशा निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी