शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

 हमीपत्रात अडकले ८२ हजार गरिबांचे रॉकेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:55 IST

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत कुटुंबात एकही गॅस सिलिंडर नसल्याचे हमीपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील बिगरगॅस शिधापत्रिकाधारकांना गत तीन महिन्यांपासून रॉकेलचे वितरण बंद करण्यात आले आहे.

- संतोष येलकर

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत कुटुंबात एकही गॅस सिलिंडर नसल्याचे हमीपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील बिगरगॅस शिधापत्रिकाधारकांना गत तीन महिन्यांपासून रॉकेलचे वितरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर नसलेल्या जिल्ह्यातील ८२ हजार ३०१ गरीब शिधापत्रिकाधारकांचे रॉकेल हमीपत्रात अडकले आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रॉकेल वितरण करताना, लाभार्थी शिधापत्रिकाधारकांच्या नावे अथवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावे गॅस जोडणी नसल्याचे घोषणापत्र (हमीपत्र) घेतल्याशिवाय रॉकेलचे वितरण करण्यात येणार नाही, असे परिपत्रक शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १ आॅगस्ट २०१८ रोजी काढण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात गॅस सिलिंडर नसल्याचे हमीपत्र सादर न करणाºया शिधापत्रिकाधारक गरीब कुटुंबांना रॉकेलचे वितरण बंद करण्यात आले. जिल्ह्यात १ लाख २४ हजार ३५१ बिगरगॅस शिधापत्रिकाधारक असून, त्यापैकी २८ डिसेंबरपर्यंत ४२ हजार ५० शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबात एकही गॅस सिलिंडर नसल्याचे हमीपत्र संबंधित रास्तभाव दुकानदारांकडे सादर केले. उर्वरित ८२ हजार ३०१ शिधापत्रिकाधारकांकडून अद्याप हमीपत्र सादर करण्यात आले नाही. जिल्हा पुरवठा विभागामार्फत हमीपत्र सादर न करणाºया जिल्ह्यातील बिरगॅस शिधापत्रिकाधारकांना दरमहा वितरित करण्यात येणारे रॉकेल गत आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले. गॅस सिलिंडर नसल्याचे हमीपत्र घेण्याच्या या प्रक्रियेत जिल्ह्यातील गॅस सिलिंडर नसलेल्या गरीब शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांपासून रॉकेलच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यातील ८२ हजार ३०१ शिधापत्रिकाधारकांनी अद्याप हमीपत्र सादर केले नसल्याने, त्यांच्या रॉकेल वितरणाची प्रक्रिया रखडली आहे.जिल्ह्यात गॅस सिलिंडर नसलेले असे आहेत शिधापत्रिकाधारक!तालुका                               शिधापत्रिकाधारकअकोला शहर                           २३,९१९अकोला ग्रामीण                     १०,०१४अकोट                                   १५,९५६तेल्हारा                                 १२,११६बाळापूर                                १७,२५५पातूर                                    ११,६१८बार्शीटाकळी                          १३,३३९मूर्तिजापूर                              २०,२३४......................................................एकूण                                    १,२४,३५१४२ हजार शिधापत्रिकाधारकांनी सादर केले हमीपत्र!जिल्ह्यात गॅस सिलिंडर नसलेल्या १ लाख २४ हजार ३५१ शिधापत्रिकाधारकांपैकी २८ डिसेंबरपर्यंत ४२ हजार ५० शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबात एकही सिलिंडर नसल्याचे हमीपत्र रास्तभाव दुकानदारांमार्फत पुरवठा विभागाकडे सादर केले आहे. उर्वरित ८२ हजारावर शिधापत्रिकाधारकांनी अद्याप हमीपत्र सादर केले नाही.

 

टॅग्स :Akolaअकोला