अकोला: बँक खाते क्रमांकाअभावी जिल्ह्यातील २४ हजारांवर शेतकर्यांचा मदतनिधी शासनाकडे सर्मपित करण्यात आला होता. संबंधित दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत वाटप करण्यासाठी ८ कोटी ५९ लाख ७३ हजार ३६५ रुपयांचा मदत निधी शुक्रवारी परत मागविण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी शासनाकडून जाहीर झालेल्या मदतीमध्ये जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्यांच्या मदतीसाठी १४५ कोटी ७२ लाख ७१ हजार २0१ रुपयांचा मदतनिधी फेब्रुवारीमध्ये प्राप्त झाला. हा मदतनिधी दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला. २0 मार्चपर्यंंंत जिल्ह्यातील एकूण दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्यांपैकी २ लाख ५७ हजार ६0१ शेतकर्यांसाठी १२९ कोटी १२ लाख ६२ हजार ४ रुपयांची मदत संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी वाटप करण्यात आली. उर्वरित दुष्काळग्रस्त २६ हजार ५ शेतकर्यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध झाले नसल्याने, १७ कोटी १८ लाख ६ हजार ५३८ रुपयांचा मदत निधी शासन आदेशानुसार २0 मार्च रोजी शासनाकडे सर्मपित करण्यात आला. बँक खाते क्रमांक प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील २४ हजार ८२७ शेतकर्यांसाठी मदतनिधी परत उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवार, २४ मार्च रोजी शासनाकडे करण्यात आली.
दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी परत मागितले ८ कोटी
By admin | Updated: April 27, 2015 01:38 IST