शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

७२ लाखांच्या शिष्यवृत्तीची महाविद्यालयांकडून वसुली; अकोला जिल्हय़ातील १0४ महाविद्यालयांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:53 IST

अकोला : शिष्यवृत्ती घोटाळ्याचा चौकशी अहवाल शासनाच्या विशेष पथकाने सादर केल्यानंतर अपहारित रक्कम वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. त्यासाठी समाजकल्याण विभागाने १0४ महाविद्यालयांना नोटीस बजावली.

ठळक मुद्दे३८ लाखांसाठी नोटीस

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिष्यवृत्ती घोटाळ्याचा चौकशी अहवाल शासनाच्या विशेष पथकाने सादर केल्यानंतर अपहारित रक्कम वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. त्यासाठी समाजकल्याण विभागाने १0४ महाविद्यालयांना नोटीस बजावली. शिष्यवृत्ती दिल्या जाणार्‍या महाविद्यालयांकडे वसूलपात्र ठरलेल्या रकमेपैकी ३४ लाख वसूल झाले असून, ३८ लाखांसाठी पुन्हा नोटीस बजावण्यात आल्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी सांगितले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजकल्याण आणि आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीच्या रकमेत २0१0 पासून मोठा घोटाळा झाला. विद्यार्थ्यांच्या नावे शिष्यवृत्ती घेऊन ती संस्थाचालक, महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांनीच हडपण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडले. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काच्या रकमेचा अपहार उघड झाला. शासनाने नियुक्त केलेल्या एसआयटीचा अहवाल, लेखा परीक्षणातील आक्षेपानुसार कोट्यवधी रुपये वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली. त्यामुळे मुख्य सचिवांनी राज्यातील सर्वच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, समाजकल्याणच्या सहायक आयुक्तांना ३१ ऑगस्टपर्यंत रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते. आदिवासी विकास विभागाकडून कारवाई सुरू झाल्यानंतर समाजकल्याण आयुक्त कार्यालयाने ७ सप्टेंबर २0१७ रोजी महाविद्यालयांकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश सहायक आयुक्त कार्यालयाला दिले. त्यावर १२ सप्टेंबर रोजी सहायक आयुक्तांनी जिल्हय़ातील १0४ महाविद्यालयांना नोटीस देत अपहार झालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम शासनजमा करण्याचे पत्र दिले. तेव्हापासून अद्यापपर्यंत निम्म्यापेक्षाही अधिक महाविद्यालयांनी रक्कम भरण्यास टाळाटाळ चालवली आहे. त्या महाविद्यालयांना चवथ्यांदा ९ जानेवारी २0१८ रोजी नोटीस बजावण्यात आल्या. 

आदिवासी विकास विभागात चार कोटींचा अपहारआदिवासी विकास विभागाच्या अकोला कार्यालयाने प्रकल्पातील ५७ महाविद्यालयांना नोटीस देत ४ कोटी २४ लाख १४ हजार ९८५ रुपये शासनजमा करण्यासाठी नोटीस दिल्या आहेत. त्यापैकी किती रक्कम वसुल झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रक्कम वसुलीपूर्वी आदिवासी विकास विभागामार्फत पडताळणी करण्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी प्रकल्प अधिकार्‍यांची समितीने प्रकरणांचा फेरआढावा घेतल्याची माहिती आहे. अन्यथा, कार्यालय सुरू करणार वसुली समाजकल्याणच्या सहायक आयुक्तांनी दिलेल्या नोटीसनुसार १0 जानेवारीपर्यंत रक्कम वसुलीबाबत महाविद्यालयाने नेमके काय केले, याचा अहवाल सादर न केल्यास कार्यालयाकडून वसुलीची कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा सहायक आयुक्त यावलीकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीणcollegeमहाविद्यालय