शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांबांवरील ७१२ फलक-बॅनर्स हटविले; महावितरणची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 19:16 IST

अकोला शहरातील मुख्य रस्त्यावरील अनेक भागात ही फलके काढण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

अकोला: विद्युत खांब व इतर विद्युत यंत्रणेवर अनधिकृतपणे लावलेले फ्लेक्स व होर्डीग्स काढण्याचे आवाहन करून कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला होता. त्यानुसार मंगळवारी अकोला शहरातील मुख्य रस्त्यावरील अनेक भागात ही फलके काढण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये जवळपास ७१२ फलके काढण्यात आली. टप्याटप्याने शहरासह जिल्ह्यात ही मोहीम राबविल्या जाणार आहे.अकोला शहरासह जिल्ह्यात महावितरणच्या विदयुत खांब, वितरण पेटी, डीपी, रोहीत्राजवळ अनेक फलक, पत्रके, फ्लक्स व बॅनर्स अनधिकृतपणे ठिकठिकाणी लावलेले आढळून येतात. त्यामुळे विदयुत यंत्रणेवर महावितरणच्या कर्मचा-यांना काम करताना अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे संबधितानी सदर फ्लेक्स वा साहित्य स्वत:च काढून टाकावे अन्यथा महावितरण कंपनी सदर साहित्य काढून कारवाई करणार असा इशारा महावितरण कंपनीने दिला होता.महावितरण कंपनीचे जिल्ह्यात शहरासह वीज पुरवठा करण्यासाठी ग्रामीण भागात विद्युत वितरण यंत्रणेचे मोठे जाळे असून खांब, वाहिन्या, रोहित्र वितरण पेटया आहेत. मात्र अनेक व्यावसायिक, संस्था, जाहीरातदार अनधिकृतपणे यावर फ्लेक्स बॅनर्स, होर्डीग्स लावतात. हे लावणे बेकायदेशीर असून सोबत विद्युत अपघातास आमंत्रण देणार सुद्धा आहे. महावितरणचे तांत्रिक कर्मचारी देखभाल दुरुस्तीची कामे करीत असताना अडथळा निर्माण होतो व अपघात सुद्धा होऊ शकतो. ही मोहीम मुख्य अभियंता अनिल डोये व अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी यांचे नेतृवाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंते, सहाय्यक अभियंते व जनमित्र यांनी पार पाडली.यापुढे सदर साहित्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना विद्युत अपघात झाला तर संबंधिताना जबाबदार धरण्यात येईल. विदयुत खांब, वितरण पेटी, डीपी, रोहीत्राजवळ फलक, पत्रके, फ्लेक्स, बॅनर्स वा कुठलेही प्रचार साहित्य अनधिकृतपणे लावू नये ,असे आवाहन महावितरणने केले आहे.अशाप्रकारे हटविण्यात आली फलकेया मोहिमत उपविभाग क्रमांक १ मध्ये २१९, उपविभाग क्रमांक २ मध्ये २४३ आणि उपविभाग क्रमांक ३ मध्ये २५० असे एकूण शहर विभागामध्ये एकूण ७१२ फ्लेक्स व बॅनर्स काढण्यात आले.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण