शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

महामार्गाच्या कामांत जलसंधारणाची ७१ कामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 14:19 IST

- संतोष येलकर,अकोला : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाच्या ७१ कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये शेततळे, तलाव, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण इत्यादी जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे.शासनाच्या मृद व जलसंधारणाच्या विभागाच्या गत २६ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक ...

ठळक मुद्देजलसंधारणाच्या कामातून उपलब्ध होणारे गौण खनिज राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी विनामूल्य देण्यात येत आहे. नाला खोलीकरण व नाला रुंदीकरण इत्यादी जलसंधारणाच्या ७१ कामांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडून परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गानजीक ही जलसंधारणाची कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.

- संतोष येलकर,अकोला : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाच्या ७१ कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये शेततळे, तलाव, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण इत्यादी जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे.शासनाच्या मृद व जलसंधारणाच्या विभागाच्या गत २६ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या महामार्ग विकास कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली माती, मुरूम व दगड इत्यादी गौण खनिजकरिता जलसंधारण उपचाराच्या कामांची सांगड घालण्यात आली आहे. त्यानुसार नवीन शेततळे खोदणे, शेततळ्यांतील गाळ काढणे, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, नाला, साठवण तलाव व पाझर तलावातील गाळ काढणे इत्यादी जलसंधारणाची कामे करण्यासाठी खोदकामातून निघणारी माती, मुरूम व दगड इत्यादी गौण खनिजाचा वापर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी करण्यात येत आहे. जलसंधारणाच्या कामातून उपलब्ध होणारे गौण खनिज राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी विनामूल्य देण्यात येत आहे. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, शेततळे, तलाव, नाला खोलीकरण व नाला रुंदीकरण इत्यादी जलसंधारणाच्या ७१ कामांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडून परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गानजीक ही जलसंधारणाची कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.कामांची परवानगी दिलेली अशी आहेत ठिकाणे!जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाच्या ७१ कामांना परवानगी देण्यात आली. त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत अन्वी, वणी रंभापूर व पैलपाडा विभाग, बोरगाव मंजू, वडगाव, दाळंबी, भोड, माझोड, बाभूळगाव शिवार, शिवणी शिवार, अन्वी मिर्झापूर, बोरगाव भाग-४, खिरपुरी खुर्द, खेकडी, कवठा बॅरेज, मनब्दा, मांडोली, गुडधी, शिवणी, शिवर, बाभूळगाव शिवार, मनब्दा ते अटकळी व पंचगव्हाण, कमळगंगा हेंडज, पळसोडा, हातगाव, सोनोरी, जामठी बु., पारस, शेळद, रिधोरा, गोरव्हा, कान्हेरी, कुरुम, नागोली, शेलू वेताळ, अनभोरा, नवसाळ, ढगा, वाशिंबा, शहापूर रूपागड, मलकापूर, उमरी व कुंभारी इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये महामार्गानजीक जलसंधारण उपचाराच्या ७१ कामांसाठी जिल्हाधिकाºयांमार्फत परवानगी देण्यात आली आहे. परवानगी देण्यात आलेल्या कामांपैकी बहुतांश कामे सुरू करण्यात आली आहेत.-डॉ.अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय