शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

सात हजारांवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ‘जीपीएफ’ खाते सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:04 IST

राज्यातील अंदाजे सात हजारांवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे जीपीएफ खाते सुरू होणार आहे.

अकोला : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकशिक्षकेतर कर्मचाºयांना शाळांना १०० टक्के अनुदान नसल्यामुळे भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यांचे जीपीएफ खातेसुद्धा उघडण्यात आले नव्हते. खाते उघडण्यासाठी काही शिक्षक, कर्मचाºयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने शिक्षक, कर्मचाºयांच्या बाजूने अंतरिम आदेश दिला. त्यामुळे राज्यातील अंदाजे सात हजारांवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे जीपीएफ खाते सुरू होणार आहे. शिक्षण संचालकांनी तसे पत्र ५ सप्टेंबर रोजी राज्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयांना पाठविले आहे.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांसाठी राज्य शासनाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना सुरू केली. तसेच अनेक शाळांना शासनाकडून १०० टक्के अनुदान मिळत नव्हते. त्यामुळे या सर्वांना जुनी पेंशन योजना आणि भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ मिळत नव्हता. एवढेच काय तर त्यांचे भविष्य निर्वाह निधी योजनेंतर्गत खातेदेखील उघडण्यात आले नव्हते. त्यांच्यावर नवीन अंशदायी पेंशन योजनेचे खाते उघडण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. पुढे या शाळांना शासनाकडून १०० टक्के अनुदान मिळाल्यानंतर नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी नवीन अंशदायी पेंशन योजनेला विरोध करून आम्ही जुने कर्मचारी असल्याने, आम्हाला जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही. अखेर खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने शिक्षक, कर्मचाºयांच्या बाजूने निर्णय देत, भविष्य निर्वाह निधी खाते सुरू करण्याबाबत शासनाला अंतरिम आदेश दिला. त्यामुळे शिक्षण संचालकांनी शिक्षण संचालनालयाचे २ जून २०१८ या पत्राच्या संदर्भानुसार राज्याच्या उपसंचालक कार्यालयांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे भविष्य निर्वाह निधी खाते सुरू करण्याबाबत कार्यवाही करून, त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)

उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे आता जवळपास सात हजारांवर शिक्षक, कर्मचाºयांचे जीपीएफचे खाते उघडण्यात येणार आहे.- ज्ञानदेव हांडे, राज्य कार्याध्यक्षखासगी प्राथ. माध्य. शिक्षक संघटना

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक