शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाला राज्यात ७०० कोटींचे देणे थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 11:31 IST

एसटी महामंडळाकडे असलेले ७०० कोटी रुपयांचे देणे अद्याप बाकी आहे.

- सचिन राऊत

अकोला : कोरोनामुळे राज्यातील परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस २३ मार्चपासून बंद असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात आार्थिक तूट निर्माण झाल्यामुळे एसटी महामंडळाकडे असलेले ७०० कोटी रुपयांचे देणे अद्याप बाकी आहे. कोरोनामुळे एसटीची वाट आणखीच बिकट झाली असून, यामधून बाहेर पडण्यासाठी सुरू असलेली धडपडही सध्या शून्य ठरत आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाकडे कंत्राटदार, शिवशाही, डिझेल खर्च तसेच चेसीस यासह विविध बाबींपोटी झालेल्या ७०० कोटी रुपयांचे देणे बाकी आहे.एसटीच्या काही बसेस सध्या सुरू आहेत. यामध्ये मुंबई उपनगरातील मुंबई, ठाणे, पालघर या तीन विभागातील एसटी बसेस सुरू आहेत; मात्र या तीन विभागातील एसटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सुरू आहेत. या व्यतिरिक्त महामंडाळाच्या राज्यभरातील बसेस बंद असल्याने त्यांचे दिवसाला २१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आधीच विविध बाबींवर झालेला खर्च तसेच कंत्राटदार व शिवशाहीचे भाडे असे ७०० कोटी रुपयांचे देणे अद्याप एसटीकडे आहे. नवीन चेसीसची खरेदी, एसटीवर झालेला तब्बल ६६ कोटी रुपयांचा डिझेल खर्च यासह देखभाल दुरुस्ती आणि इतर बाबी असा एकूण ७०० कोटी रुपये एसटीकडे थकीत असून, हे देणे त्यांना लवकरच अदा करावे लागणार आहे. आधीच एसटीची चाके १०० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून बंद असताना या बाकी रकमेमुळे महामंडळाचा प्रवास बिकट परिस्थितीतून सुरू आहे. महामंडळाच्या तिजोरीत ठणठणाट१०० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटीची चाके थांबलेली आहेत. अशातच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी महामंडळाला पैशांची गरज असताना त्यांच्या तिजोरीत मात्र सध्या ठणठणाट आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागविणे आणि वाहनांची देखभाल, दुरुस्ती करण्यासारखी महत्त्वाची कामेही सध्या अत्यंत कमी प्रमाणात सुरू आहेत. या बाबींवर होतोय खर्चएसटी महामंडळाचा विविध बाबींवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असून, त्यामुळेच एसटी महामंडळाने विविध खर्चापोटी देणे असलेल्यामध्ये ६६ कोटी रुपये हे डिझेल खर्चाचे आहेत. तर नवीन एसटीचे चेसीस, टायर, शिवशाहीचा खर्च, ब्रिक्स, खासगी कंत्राटदार आणि ट्रायमेक्सवरील खर्चाचा आकाडा ७०० कोटी रुपयांच्या घरात आहे. यासोबतच एसटी को-आॅपरेटिव्ह सोसायटीतील कपात रक्कम आणि एसटी बँकेतील कपात रकमेचाही या देण्यामध्ये समावेश आहे.

 

टॅग्स :state transportएसटीAkolaअकोला