शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात सात हजारावर शेतकऱ्यांना मिळाला नाही विमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:23 IST

अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी ८४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १०२ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली असली तरी, जिल्ह्यात सात हजारावर शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली नाही.

ठळक मुद्देगतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. ८४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात विमा कंपनीमार्फत १०२ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली.गतवर्षी पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सात हजारांवर शेतकºयांना अद्याप पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.

- संतोष येलकर

अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी ८४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १०२ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली असली तरी, जिल्ह्यात सात हजारावर शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे पीक विम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. पीक विमा हप्त्याची रक्कम (प्रीमियम) संबंधित बँकेत जमा करून, जिल्ह्यातील शेतकºयांनी कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांची विमा काढला. पीक विमा काढलेल्या शेतकºयांपैकी विम्याचा लाभ मंजूर झालेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया गत ६ जूनपासून नॅशनल इश्युरन्स कंपनीमार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात विमा कंपनीमार्फत १०२ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली; परंतु यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी, गतवर्षी पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सात हजारांवर शेतकºयांना अद्याप पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पीक विम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकºयांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पीक विमा मंजूर शेतकºयांची विमा कंपनीकडे नाही माहिती!गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ४७ हजार शेतकºयांनी पीक विमा काढला. त्यापैकी पीक विमा मंजूर झालेल्या शेतकºयांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया नॅशनल इश्युरन्स कंपनीमार्फत सुरू करण्यात आली. गत जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार शेतकºयांच्या खात्यात विमा कंपनीमार्फत विम्याची रक्कम जमा करण्यात आली; मात्र जिल्ह्यात गतवर्षी पीक विमा काढलेल्या शेतकºयांपैकी किती शेतकºयांना पीक विमा मंजूर करण्यात आला, यासंदर्भात नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या अकोला विभागीय कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नसल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.दोन टप्प्यात १०२ कोटींची रक्कम शेतकºयांच्या खात्यात!पीक विम्यापोटी पहिल्या टप्प्यात ६३ कोटी आणि दुसºया टप्प्यात ३९ कोटी अशी एकूण १०२ कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम जिल्ह्यातील ८४ हजार शेतकºयांच्या खात्यात नॅशनल इन्शुरन्स कंपनीमार्फत जमा करण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरी