शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर तालुक्यात वॉटर कप स्पर्धेसाठी ६७ गावाची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:50 IST

पाणी फाऊंडेशनअंतर्गत मंगरूळपीर तालुक्याची फेरनिवड : नोंदणी करण्याचे आवाहन  लोकमत न्यूज नेटवर्क मंगरूळपीर ( वाशिम ) : पाणी फाउंडेशनअंतर्गत ...

पाणी फाऊंडेशनअंतर्गत मंगरूळपीर तालुक्याची फेरनिवड : नोंदणी करण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम) : पाणी फाउंडेशनअंतर्गत मंगरुळपीर तालुक्याची  फेरनिवड करण्यात आली आहे असून, स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नवीन नावनोंदणी सुरु झाली आहे. आतापर्यंत तालुक्यातील १३७ गावांपैकी ६७ गावांनी नोंदणी केली आहे. दरम्यान या स्पर्धेत अधिकाधिक गावांनी नोंदणी करण्याचे आवाहन तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी शुक्रवारी पंचायत समिती येथे आयोजित तालुकास्तरीय सभेत केले.सभेला तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्तापे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, पंचायत विस्तार अधिकारी पदमने, कृषि अधिकारी प्रल्हाद शेळके, शाखा अभियंता मुल्ला, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक प्रशांत अवचार उपस्थित होते. पाणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हे अभिनेते अमिर खान असून, या अभियानात महाराष्ट्रातील ७५ तालुक्यांचा समावेश आहे. यावर्षीदेखील मंगरूळपीर तालुक्याची फेरनिवड झाली आहे.पाणी फाऊंडेशनने गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा फायदा बोरव्हा बू, लखमापुर, शेंदुरजेंना मोरे या गावांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. अपुº्या पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणुन जाहिर केले असल्याने यावर मंगरुळपीर येथील बोरव्हा बु. गाव मात्र पाण्याच्या उपलब्धतेसाठी एक उदाहरण ठरत आहे. यासाठी तालुका पातळी पासून तर गांव पातळीपर्यंत प्रशासन, लोकसहभाग, नागरिकांचे बहुमोल सहकार्य मिळाले आहे, असे मत तहसिलदार वैशाख वाहूरवाघ यांनी व्यक्त केले. तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी  गावागावात लोकांना प्रोस्ताहित करुण लोकसहभागातुन वेगवेगळे उपक्रम हाती घेणार आहे, असे  सुभाष नानवटे यांनी यावेळी सांगितले. मागील  वर्षी वॉटर कप स्पर्धेत  उत्तम काम करणाºया वॉटर हिरो, अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील वनरक्षक संतोष गौंड यांनी उपस्थितांना पाणी फाऊंडेशनसंदर्भात मार्गदर्शन केले. सुदाम इस्कापे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी यावेळी विचार व्यक्त केले.  स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नवीन नावनोंदणी सुरु असून, तालुक्यातील  अधिकाधिक गावांनी नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. प्रस्ताविक तालुका समन्वयक समाधान वानखडे यांनी तर संचालन अतुल तायडे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, जलमित्र, वॉटर हीरो रोजगार सेवक यांची उपस्थिती होती. प्रशांत अवचार यांनी आभार मानले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा