शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार ६५६६ शेतकऱ्यांना मिळू शकतो ‘वन टाइम सेटलमेंट’चा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:47 IST

अकोला जिल्ह्यातील थकबाकीदार ६ हजार ५६६ शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

- संतोष येलकर अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट) योजनेत दीड लाखांवरील रक्कम भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनामार्फत १९ डिसेंबर रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार ६ हजार ५६६ शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या राज्यातील शेतकºयांना दिलासा देण्यासाठी गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी घोषित करण्यात आली. त्यामध्ये मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत पात्र शेतकºयांना दीड लाखांवरील त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम बँकेत जमा करण्याची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुषंगाने ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेत पात्र शेतकºयांसाठी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने १९ डिसेंबर रोजी घेतला आहे. त्यानुसार दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ५६६ शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.१.२९ लाख शेतकºयांना ५५२ कोटींची कर्जमाफी!कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी गत दीड वर्षांच्या कालावधीत २१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात १ लाख २९ हजार ३५६ शेतकºयांना ५५२ कोटी ४२ लाख ७१ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. उर्वरित नऊ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अद्याप बाकी आहे.

जिल्ह्यात दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेले असे आहेत शेतकरी!जिल्ह्यात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले ६ हजार ५६६ शेतकरी आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत २ हजार ९६६ शेतकरी आणि जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे ३ हजार ६०० शेतकºयांचा समावेश आहे. या थकबाकीदार शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळू शकतो. 

कर्जमाफी योजनेत दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेस शासनाकडून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील ६ हजार ५६६ शेतकºयांना लाभ मिळू शकतो.- जी. जी. मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी