शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही ६४ गावांना पंधरा दिवसाआड पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:52 IST

जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पंधरा दिवस पुरेल एवढे पाणी साठवून ठेवणे अशक्य असल्याने, पावसाळ्यातही तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यांत वाढ झाली नसून, नदी-नाले कोरडे पडले आहेत. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पावसाळ्यातही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. महान येथील काटेपूर्णा धरणातून अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या पृष्ठभूमीवर आवश्यकतेनुसार या धरणातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी सोडण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी गत आठवड्यात महान येथील काटेपूर्णा धरणातून १ दशलक्ष घनमीटर पाणी खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यात सोडण्यात आले. उपलब्ध जलसाठ्यातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सध्या १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र १५ दिवसांतून एकदा मिळणारे पाणी पिण्यासाठी साठवून ठेवणे अशक्य असल्याने, पावसाळ्यातही तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. विहीर, बोअर आणि नदी-नाल्यातील झिºयातील पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. तर काहींना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत असल्याची स्थिती आहे.उन्नई बंधाºयात महिनाभर पुरेल एवढा जलसाठा!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाºयात पाणी सोडले जाते. गत आठवड्यात या बंधाºयात १ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले असून, त्यामधून गावांना सध्या १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यानुसार ६४ गावांना महिनाभर पुरेल एवढा जलसाठा उन्नई बंधाºयात उपलब्ध आहे.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सध्या पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यानुसार योजनेंतर्गत गावांना महिनाभर पाणीपुरवठा होऊ शकेल एवढा जलसाठा उन्नई बंधाºयात उपलब्ध आहे.- अनिल चव्हाणशाखा अभियंता, जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा, उपविभाग, अकोला.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAkolaअकोला