शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ६१ कोटींची दुष्काळी मदत वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 13:11 IST

तहसील कार्यालयांमार्फत दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

अकोला: गतवर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना चवथ्या टप्प्यातील दुष्काळी मदत वाटप करण्यासाठी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला असून, उपलब्ध मदत निधी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला असून, तहसील कार्यालयांमार्फत दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.गतवर्षी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या पहिल्या यादीत अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १९९ कोटी रुपये मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासनामार्फत मंजूर करण्यात आलेल्या मदतीच्या रकमेपैकी तीन टप्प्यात १३७ कोटी ६१ लाख २ हजार ४५६ रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला होता. उपलब्ध दुष्काळी मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. उर्वरित चवथ्या टप्प्यातील ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत प्रलंबित होती. अखेर १० सप्टेंबर रोजी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदत निधी १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांमार्फत दुष्काळी मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.तालुकानिहाय अशी वितरित करण्यात आली मदत!जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकºयांसाठी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत संबंधित पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुका-१६ कोटी २५ लाख ७ हजार ५१७ रुपये, बार्शीटाकळी तालुका-१० कोटी १३ लाख ३१ हजार २७४ रुपये, तेल्हारा तालुका-९ कोटी ५९ लाख १२ हजार ७९७ रुपये, बाळापूर तालुका-१२ कोटी ५१ लाख ९१ हजार २४५ रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी १२ कोटी ९९ लाख ६४ हजार ५१४ रुपयांचा मदत निधी वितरित करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी