शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद प्रशासनाने ठेवल्या ६0 टक्के तक्रारी प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:46 IST

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दर सोमवारी जनता दरबार  घेण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून झालेल्या जनता दरबारा तील तक्रारींच्या निपटार्‍याचा आढावा घेतला असता, जिल्हा परिषद  प्रशासनाने तक्रारी दूर करण्यात दिरंगाई केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा जनता दरबार १९८ तक्रारींवर निर्णय नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दर सोमवारी जनता दरबार  घेण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून झालेल्या जनता दरबारा तील तक्रारींच्या निपटार्‍याचा आढावा घेतला असता, जिल्हा परिषद  प्रशासनाने तक्रारी दूर करण्यात दिरंगाई केल्याचे समोर आले आहे. ऑ क्टोबर महिन्यापासून जनता दरबारात जिल्हा परिषदेच्या विविध कामांबाबत  एकूण ३४३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, आजपर्यंत १९८ तक्रारींचा अनु पालन अहवाल प्रलंबित आहे. म्हणजेच जवळपास ६0 टक्के तक्रारींचा  अनुपालन अहवाल प्रलंबित असल्याचे पालकमंत्र्यांच्या कार्यालयाने स्पष्ट  केले. दर सोमवारी पालकमंत्र्यांकडून जनतेच्या प्राप्त तक्रारींवर अनुपालनाचा  आढावा घेतला जातो. या आढाव्यामध्ये त्या विभागप्रमुखांनी केलेल्या  कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. त्याप्रमाणे  महसूल विभागाची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा १२ फेब्रुवारी २0१८ ला आढावा घेण्यात  आला. आढाव्यादरम्यान जिल्हा परिषदेच्या नोव्हेंबर, डिसेंबर व  जानेवारीमधील विविध प्रलंबित तक्रारींवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही  झालेली आढळली नाही. मागील चार महिन्यातील विविध तक्रारकर्ते वारंवार  हजर राहून त्याबाबत तक्रार करत राहतात. या आढाव्यामध्ये जिल्हा परिषद  प्रशासकीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संबंधित प्राधिकृत  अधिकार्‍याला या दिरंगाई व तक्रारींकडे केलेल्या दुर्लक्षाकरिता जाब  विचारण्यात आला. याबाबत यापूर्वीही संबंधितांना बर्‍याचदा सूचना दिल्या  होत्या. परंतु, फक्त जिल्हा परिषद प्रशासन याबाबत मोठय़ा प्रमाणात दुर्लक्ष  करीत असल्याचे निदर्शनास आल्याचेही पालकमंत्र्यांच्या कार्यालयाने स्पष्ट  केले आहे. या विभागासंबंधी सर्व तक्रारी अतिदुर्गम भागातील असून,  आदिवासी दलित लोकसंख्या असलेल्या भागातील आहेत. जिल्हा  परिषदेमधील ग्रामीण भागाशी संबंधित अनेक तक्रारी जनता दरबारमध्ये प्राप्त  झालेल्या आहेत. या गोर-गरीब जनतेला १00-१५0 कि. मी. प्रवास करून  येथे येणे खूप त्रासदायक होते. त्यांची कामे तत्काळ मार्गी लागावे, याकरिता  प्रशासनाला जबाबदारीने काम करण्याची गरज असतानाही दिरंगाई केली  जात असल्याचा आरोप होत आहे. जनता दरबारात आलेल्या इतर सर्व  विभागांचे तक्रारींचे अनुपालन साधारण ९0 टक्के आहे. जिल्हा परिषदेच्या  ऑक्टोबर ते फेब्रुवारीपयर्ंत एकूण ३४३ तक्रारी प्राप्त असून, आजपर्यंत  १९८ तक्रारींचा अनुपालन अहवाल प्रलंबित आहे. म्हणजेच जवळपास ६0  टक्के तक्रारींचा अनुपालन अहवाल प्रलंबित असल्याचे स्पष्ट करण्यात  आले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAkola cityअकोला शहर