शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

शेतकऱ्यांना मदत वाटपाचे ६० कोटी प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:36 PM

मदत वाटपासाठी प्रलंबित ६० कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १३ जानेवारी रोजी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी तिसºया टप्प्यातील ६० कोटींची रक्कम अद्याप शासनाकडून प्राप्त झाली नाही. त्यानुषंगाने शेतकºयांना मदत वाटपासाठी प्रलंबित ६० कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १३ जानेवारी रोजी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या पहिल्या व दुसºया टप्प्यात १३ डिसेंबरपर्यंत २३१ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांची मदत शासनाकडून प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यातील उर्वरित ६० कोटी रुपयांची मदत मात्र अद्याप शासनाकडून प्राप्त झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी तिसºया टप्प्यातील प्रलंबित ६० कोटी रुपयांच्या मदत निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे.अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी तिसºया टप्प्यातील ६० कोटी रुपयांची मदत निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मदतीची रक्कम लवकरच शासनाकडून प्राप्त होणार आहे.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी