शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक शोषण करणारे  ६ आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 17:25 IST

Crime News : एका गावातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण करुन लैंगिक शोषण केल्या प्रकरणी ६ जणांना माना पोलिसांनी अटक केली आहे.

मूर्तिजापूर : तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण करुन लैंगिक शोषण केल्या प्रकरणी ६ जणांना माना पोलिसांनी अटक केली आहे. पैकी ५ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर मुख्य आरोपी गजानन तायडे याला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने दिले आहेत. 

             गजानन उर्फ गोलू बाळू तायडे (२१ राहणार ऐंडली) ता. मूर्तिजापूर याने आपल्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार ११ जानेवारी रोजी तिच्या पालकांनी माना पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती त्या पुर्वीच आरोपीपासून गजानन बाळू तायडे हा अल्पवयीन मुलीला घेऊन पसार झाला होता, प्रथम दर्शनी तो मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, अकोला सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीची झारखंड मध्ये सुध्दा शोधाशोध सुरुच होती या कामी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनीका राऊत व उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार कैलास भगत यांनी एक पथक तयार करुन आरोपीला पीडितेसह कर्नाटक राज्यातून ताब्यात घेऊन तेथील तुरुवेकेरे येथील स्थानिक न्यायालयात हजर करुन ट्रान्झिट रिमांड घेऊन माना येथे आणण्यात आले. गजानन तायडे याला गुन्ह्यात मदत करणारे आरोपी योगेश विठ्ठलराव वानखडे (रा. आमला ता. दर्यापूर), सीमा संजय भालेराव (३५ रा.ऐंडली ह. मु. अमरावती), मिलींद देविदास खडसे (भागेरथी कॉम्प्लेक्स बदलापूर पश्चिम ठाणे), कैलास शंकर तायडे (वार्ड क्र. २ अमरावती) अमोल शंकरराव चव्हाण (रा. बिलोना ता. अचलपुर) यांना अटक करण्यात आली असून त्यांची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध कलम ३६३, ३६६, ३७६, १०९, २१२ व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार कैलास भगत याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील, पोलीस शिपाई जयकुमार मंडावरे, आकाश काळे, वनीता चव्हाण यांनी पार पाडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर