शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

५८ गुरांची कोंबून वाहतूक करणारा ट्रक पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:40 IST

मूर्तिजापूर शहरातील गुल्हाने मंगल कार्यालयाच्या पाठीमागे १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास एका ट्रकातून गुरे उतरविण्यात येत असल्याच्या गुप्त माहितीवरून ठाणेदार पडघन यांनी धाड टाकून ट्रकसह गुरे ताब्यात घेतली.

ठळक मुद्देदोन गुरांचा मृत्यू ट्रकचालक फरार 

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : मूर्तिजापूर शहरातील गुल्हाने मंगल कार्यालयाच्या पाठीमागे १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास एका ट्रकातून गुरे उतरविण्यात येत असल्याच्या गुप्त माहितीवरून ठाणेदार पडघन यांनी धाड टाकून ट्रकसह गुरे ताब्यात घेतली. पोलिसांना पाहताच ट्रकचालकासह इतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. सदर गुरे कोठून आणि कुणाकडे आणण्यात आली होती, याबाबत सखोल तपास मूर्तिजापूरचे ठाणेदार करीत आहेत.येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ११ गुरे पकडली होती. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास जुन्या शहरातील गुल्हाने मंगल कार्यालयाच्या मागे अवैधरीत्या गुरे भरून आणलेल्या ट्रकातून गुरांना उतरविण्यात येत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन पडघन, पोहेकॉं. गणेश पांडे, पोकॉं. दीपक तायडे, गोलंदाज लांजेवार, नीलेश खंडारे, अमोल वाहेकर, मोईन खान, चालक नंदकिशोर दीपकवार यांनी कारवाई करून एमपी 0९ एचजी ३२९९ क्रमांकाचा ट्रक पकडला. सदर ट्रकमध्ये ५८ गुरे अक्षरश: कोंबून आणण्यात आली होती. यापैकी दोन गुरांचा मृत्यू झाला होता. इतर गुरांची स्थिती पाहवली जात नव्हती. ठाणेदारांनी या गुरांवर वैद्यकीय उपचार करण्याकरिता डॉक्टरांची मदत घेतली.  पोलिसांना मिळालेल्या कागदपत्रानुसार सदर ट्रक इंदोरवरून आला असल्याचे दिसून येत आहे; परंतु तपासानंतर खरी परिस्थिती समजणार आहे. सदर गुरे पुंडलीक महाराज गोरक्षणाचे अँड. पांडे, विशाल गुप्ता, धीरज मोकाशे यांच्या उपस्थितीत गोरक्षणच्या सुपूर्द करण्यात आली. 

टॅग्स :Crimeगुन्हा