आगर(जि. अकोला), दि. ३0: येथून जवळच असलेल्या उगवा येथील एका महिलेने जाळून घेतल्याने तिचा मृत्यू होण्याची घटना घडली. याबाबत प्राप्त माहिती अशी की उगवा येथील मायाबाई रामनाथ वाघ (५६) यांनी आपल्या राहत्या घरी सोमवारी रात्री स्वत:ला जाळून घेतले. त्यांना उपचारासाठी ताबडतोब अकोला येथे रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणारे त्यांचे पती रामनाथ वाघ हे सुद्धा गंभीररीत्या भाजल्या गेले आहेत. त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील पोलीस तपास सुरू आहे.
५६ वर्षीय महिलेने घेतले जाळून
By admin | Updated: August 31, 2016 02:44 IST