शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची अडकली कामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 13:16 IST

अकोला: जिल्ह्यातील विविध भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू असताना, अडकलेली पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांसाठी २६ कोटींचा आराखडा मंजूर.महिनाभराचा कालावधी उलटून जात असताना संबंधित यंत्रणांनी पाणीटंचाई निवारणार्थ प्रस्ताव सादर केले नाही.प्रस्तवांअभावी अडकलेली जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकरअकोला: जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांकरिता २६ कोटी ८५ लाख रुपयांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाºयांनी गत महिन्यात मंजुरी दिली; मात्र संबंधित यंत्रणांकडून कामांचे प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे कृती आराखड्यात समाविष्ट कामे अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यानुषंगाने जिल्ह्यातील विविध भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू असताना, अडकलेली पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे पडले असून, धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातल्या खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत टंचाईग्रस्त ६० गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या टँकरसह हातपंपांच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जिल्ह्यातील इतर गावांतही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला असून, अनेक गावांमध्ये पाणी विकत घेऊन तहान भागविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या पृष्ठभूमीवर आॅक्टोबर ते जून या कालावधीसाठी जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यास जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत ११ डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे. महिनाभराचा कालावधी उलटून जात असताना पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात समाविष्ट कामांसाठी जिल्ह्यातील पंचायत समिती, तहसील कार्यालय व जिल्हा परिषद इत्यादी यंत्रणांमार्फत कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारण कृती आराखडा मंजूर असला तरी, जिल्ह्यात प्रत्यक्ष पाणीटंचाई निवारणाची कामे अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने, प्रस्तवांअभावी अडकलेली जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरwater transportजलवाहतूकzpजिल्हा परिषद