लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खदान व कोतवाली पोलिसांनी आदर्श कॉलनी आणि लक्झरी बस स्टँड परिसरात छापे घालून दारू नेणाऱ्या तिघांना अटक करून त्याच्याकडून ५३ हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. खदान पोलिसांनी आदर्श कॉलनीत छापा घालून अवैधरीत्या देशी दारूच्या बाटल्या नेणाऱ्या गौतम वानखडे याला अटक केली. त्याच्याकडून देशी दारूच्या बाटल्यांसह एक मोटारसायकल, असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई एएसआय गोपीलाल मावळे, अविनाश पाचपोर यांनी केली. दुसरी कारवाई कोतवाली पोलिसांनी लक्झरी बसस्टँडवर केली. कोतवाली पोलिसांनी यशवंतनगरात राहणारा राजू शालिग्राम भोजने, गीतानगरातील अविनाश भगत याच्याकडून देशी दारूच्या ३७ बाटल्या, मोटरसायकल, असा एकूण २१ हजार ९२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरातील दारूची दुकाने, वाईन बार बंद झाल्याने, अवैध मार्गाने दारूची वाहतूक आणि विक्रीचे प्रमाण वाढले असून, पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूच्या बाटल्या खरेदी करून अवैध विक्री करणारे ग्रामीण भागात दामदुपटीने दारूची विक्री करीत आहेत.
५३ हजारांची दारू जप्त
By admin | Updated: May 15, 2017 01:55 IST