शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण ; बळींचा आकडा ४०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:17 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८१३ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ४१७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८१३ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ४१७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३९६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी १८, मोठी उमरी येथील १०, गीता नगर येथील नऊ, आलेगाव येथील आठ, कौलखेड, सिंधी कॅम्प, शास्त्री नगर व पातूर येथील प्रत्येकी सात, मूर्तिजापूर येथील सहा, जीएमसी, रिधोरा, अकोट फैल, गोरक्षण रोड, खदान, आदर्श कॉलनी, वाशिम बायपास, रामदासपेठ, मलकापूर, रणपिसे नगर, बाळापूर व बोराळा येथील प्रत्येकी पाच, खडकी येथील चार, गांधी रोड, कळंबेश्वर, खोलेश्वर, कीर्ती नगर, राम नगर, सातरगाव, अकोट, लहान उमरी, खेतान नगर, आळसी प्लॉट, माना, चोहट्टा बाजार, जुने शहर येथील प्रत्येकी तीन, तारफैल, देशमुख फैल, माधव नगर, गिरी नगर, गुडधी, हमजा प्लॉट, हिवरखेड, मेहरे कॉलनी, मुकुंद नगर, रजपूतपुरा, जाजू नगर, हरिहर पेठ, जठारपेठ, घुसर, शिवाजी नगर, बोरवाकडी व कुरुम येथील प्रत्येकी दोन, निबंध प्लॉट, राऊतवाडी, शिवणी, चोहगाव, शिवर, कान्हेरी सरप, व्दारका नगर, मेहबूब नगर, चिखलपुरा, शंकर नगर, अशोक नगर, पंचशील नगर, तोष्णीवाल ले-आऊट, गुलजारपुरा, हिंगणा फाटा, खरप, बार्शिटाकळी, कैलास टेकडी, जामठी बु., न्यू खेतान नगर, चांदूर, सुधीर कॉलनी, रघुवीर नगर, मारोती नगर, इंद्रा नगर, शिवसेना वसाहत, जयहिंद चौक, मांजरी, पूनम हॉटेल, तुकाराम चौक, सावत्रा चाळ, लंकडगंज, गंगा नगर, नयागाव, बरलिंगा, आपातापा, भीमनगर, सोनटक्के प्लॉट, आपोती, शनी मंदिरामागे, बापू नगर, कल्याणवाडी, भागवतवाडी, महाकाली नगर, भगीरथवाडी, प्रेम नगर, लोकमान्य नगर, गाडगे नगर, पोलिस हेडक्वॉर्टर, चाचोंडी, गोडबोले प्लॉट, मोरगाव भाकरे, पतनवथल, लखनवाडा, स्टेशनरोड, दीपक चौक, मूर्तिजापूर रोड, तापडिया नगर, हिंगणा रोड, दूधडेअरी समोर, गड्डम प्लॉट, मनकर्णा प्लॉट, राजंदा, अखातवाडा, प्रशासन विभाग, कृषी विभाग, जीएमसी हॉस्टेल, गजानन नगर, देवी पोलिस, आरटीओ रोड, न्यू राधाकिसन प्लॉट, अनिकेत पोलिस लाईन, जय माता दी चौक, सरकारी गोडाऊन, अडगाव, हातरुण, भाकराबाद, चान्नी चौकी, गणेश गिरी, न्यू भीमनगर, दुर्गा चौक व जैन चौक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी सिंधी कॅम्प व डाबकी रोड येथील प्रत्येकी सहा, जठारपेठ, आदर्श कॉलनी व खडकी येथील प्रत्येकी पाच, रामदासपेठ व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी चार, गीता नगर, लहान उमरी, मलकापूर व मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, रजपूतपुरा, हिंगणा, तोष्णीवाल ले-आऊट, संतता नगर, सुधीर कॉलनी, गायत्री नगर, पिंजर, बोरगाव वैराळे व सातव चौक येथील प्रत्येकी दोन, मालीपुरा, जुने शहर, जयहिंद चौक, पोलिस हेडक्वॉर्टर, गोकर्णकार, खोलेश्वर, वानखडे नगर, अंजनगाव, कपिलवस्तू, केशव नगर, डॉक्टर कॉलनी, चोहोगाव, बार्शिटाकळी, कापशी रोड, रणपिसे नगर, बाळापूर, डीएचओ ऑफीस, काँग्रेस नगर, तुकाराम चौक, बालाजी नगर, पातूर, डोंगरगाव, खेडकर नगर, जुने आरटीओ रोड, कीर्ती नगर, जोगलेकर प्लॉट, अनिकेत, अपोती, वृंदावन नगर, शिवाजी नगर, गुलजारपुरा, तापडिया नगर, तौलीपंच, सैद, जवाहर नगर व तेल्हारा येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

एक महिला, दोन पुरुषांचा मृत्यू

बाळापूर येथील ७० वर्षीय महिला, रजपूतपुरा, अकोला येथील ८५ वर्षीय पुरुष व आपातापा रोड, अकोला येथील ६१ वर्षीय पुरुष अशा तिघांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघांनाही अनुक्रमे, १२, ११ व १० मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

३३५ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, बिहाडे हॉस्पिटल येथील पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून पाच, नवजीवन हॉस्पिटल येथून ११, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, सहारा हॉस्पिटल येथील एक, युनिक हॉस्पिटल येथील चार, बाॅईज होस्टेल अकोला येथून २८, हॉटेल स्कायलार्क येथून ११, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथून दोन, हेंडज कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून १८, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, कोविड केअर सेंटर पास्टूल अकोट येथून १९, ओझोन हॉस्पिटल येथून तीन, तर होम आयसोलेशन येथील १८० अशा एकूण ३३५ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.

आतापर्यंत २१,०६२ कोरोनाबाधित

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१,०६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १५,५२८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४०० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.