शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दोन किलो सोने चोरणार्‍यांची माहिती देणार्‍यास ५0 हजारांचे इनाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 02:02 IST

अकोला : शहरातील सराफा व्यावसायिकाच्या कुरिअर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी रोजी लुटमार करणार्‍या चोरट्यांची माहिती देणार्‍यास स्थानिक गुन्हे शाखेने ५0 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

ठळक मुद्देमाहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवणारस्थानिक गुन्हे शाखेची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील सराफा व्यावसायिकाच्या कुरिअर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी रोजी लुटमार करणार्‍या चोरट्यांची माहिती देणार्‍यास स्थानिक गुन्हे शाखेने ५0 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या चार चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेले छायाचित्र पोलिसांनी जारी केले असून, सदर वर्णनाचे चोरटे कुणालाही दिसल्यास त्यांनी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. प्रशांत कुरिअरचे संचालक प्रशांत शहा यांच्या कुरिअर सर्व्हिसमध्ये आदर्श कॉलनी येथील रहिवासी हिंमत आनंदराव काकडे हे कुरिअर बॉय म्हणून कामाला आहेत. ते मुंबई-हावडा मेल एक्स्प्रेसने ७ फेब्रुवारी रोजी रात्री मुंबई येथून अकोल्यात येण्यासाठी निघाले होते. ८ फेब्रुवारीच्या पहाटे अकोला रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांनी रेल्वेस्थानकाच्या वाहनतळातील स्वत:ची दुचाकी क्रमांक एमएच ३0 एन ४४९२ काढल्यानंतर समोरील चौकात आले असता पोलीस चौकीजवळ दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी थांबवून काकड यांच्याकडील १६ लाख १५ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली होती. हा प्रकार झाला तेव्हा हिंमत काकडे यांनी आरडाओरड न करता शहा हॉस्पिटलसमोर असलेल्या त्यांच्या मालकाकडे धाव घेतली होती. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला; मात्र आठ महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही चोरट्यांची माहिती मिळत नसल्याने त्यांची माहिती देणार्‍यास स्थानिक गुन्हे शाखेने ५0 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यासोबतच माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही नागरे यांनी स्पष्ट केले आहे.

मालकाची व कुरिअर बॉयची चौकशीया लुटमारप्रकरणी काकड यांच्याकडील रोकड आणि दागिने लुटीची ही तिसरी घटना असल्याने पोलिसांचा प्राथमिक तपासात संशय काकड व त्यांचे मालक शहा यांच्यावरच होता. त्यामुळे शहा आणि काकड यांची कसून चौकशी पोलिसांनी केली होती.

‘एमपी’मध्ये घेतला होता शोध या प्रकरणातील चोरट्यांचा शोध सुरू केल्यानंतर ही टोळी मध्य प्रदेशातील असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने मध्य प्रदेशात तसेच अमरावतीमधील बडनेरा येथे पोलिसांनी शोध घेतला होता; मात्र पोलिसांच्या हातात आतापर्यंत काहीच लागले नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा