शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांअभावी ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 16:31 IST

१०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसल्याने राज्यभारतील जवळपास ५० टक्के रुग्णवाहिकांना ब्रेक लागला आहे.

- प्रवीण खेतेअकोला : कमी वेतनामुळे डॉक्टर १०८ रुग्णवाहिकेमध्ये सेवा देण्यास नकार देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांशिवाय रुग्णवाहिका कॉलवर नेणे शक्य नसल्याने राज्यभरातील जवळपास ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांना ब्रेक लागल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाने बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या मदतीने २०१३ मध्ये राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली होती. यामध्ये अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट आणि बेसिक लाइफ सपोर्ट अशा दोन प्रकारच्या रुग्णवाहिकांचा समावेश आहे. अपघात झाल्यास किंवा दवाखान्यातून जाऊन तत्काळ उपचार घेण्याची गरज भासल्यास १०८ क्रमांकावर कॉल करताच किमान वेळेत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होते. रुग्णवाहिका वेळेत आल्याने अनेकांना योग्य वेळी उपचारही मिळतो; पण रुग्णांसाठी संजीवनी ठरणाऱ्या या रुग्णवाहिकेवर कार्यरत डॉक्टरांना मिळणारे वेतन अत्यल्प आहे. त्यामुळे राज्यभरातील बहुतांश रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी सेवा देण्यास नकार दिला आहे. १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसल्याने राज्यभारतील जवळपास ५० टक्के रुग्णवाहिकांना ब्रेक लागला आहे.रुग्णवाहिकांचे मेन्टन्स नाहीच!१०८ सेवा पुरविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो; परंतु या रुग्णवाहिकांची नियमित देखभाल केली जात नाही. त्यामुळे अनेक रुग्णवाहिका बंद आहेत. शिवाय, बहुतांश नादुरुस्त रुग्णवाहिका रस्त्यावर धावत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.अकोला जिल्ह्यातील स्थिती

  • जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या १२
  • ५० पैकी केवळ ३३ वैद्यकीय अधिकारी देताहेत सेवा
  • वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील ५० टक्के रुग्णवाहिका बंद
  • परिणामी अकोल्यातील रुग्णवाहिका देताहेत वाशिम, बुलडाणा अन् अमरावतीमध्ये सेवा
  • पातूर, बाळापूर, पिंजर येथील रुग्णवाहिकांना इतर जिल्ह्यातील कॉल

१०८ अकोला वुमन्स रुग्णवाहिका बंदअकोला जिल्ह्यातील १०८ वुमन्स रुग्णवाहिकेमध्ये बिघाड असल्याने गत १५ दिवसांपासून रुग्णवाहिकेची सेवा ठप्प आहे. विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेवर तीन डॉक्टर कार्यरत आहे; परंतु नियमित रुग्णवाहिकेची देखभाल होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.१०८ रुग्णवाहिकेच्या सेवेमध्ये अनेक समस्या उद््भवत आहेत. काही रुग्णवाहिकांची सेवा बंद असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रुग्णवाहिकांच्या समस्येमुळे रुग्णसेवा प्रभावित होत आहे. या संदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांनी आढावा घेतला आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य