शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

३२ वर्षांनी मिळाली ४८ लाखांची भरपाई; अपघातग्रस्ताचे साेने दाखविले होते गहाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 06:35 IST

कोर्टाची पोलिसांना चपराक, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी वहिनीच्या नावाने दाखल याचिकेत केला होता. 

अकोला : यवतमाळ येथे तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कार्यकारी अभियंता असलेले पुरुषोत्तम हरणे यांचे मूळगावी अकोल्याकडे येताना २३ मार्च १९८९ रोजी अपघाती निधन झाले होते. पोलिसांच्या हलगर्जीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत हरणे कुटुंबीयांनी पोलिसांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात तब्बल ३२ वर्षे लढा दिल्यानंतर हरणे कुटुंबीयांना डिक्रीचे ४८ लाख ३२ हजार रुपये व्याजासह मिळाले आहेत. 

पुरुषोत्तम हरणे हे दुचाकीने यवतमाळ येथून अकोल्याकडे येत असताना बोरगाव मंजूजवळ त्यांची गाडी स्लिप होऊन ते बेशुद्ध पडले. त्यांना बोरगाव मंजू पोलिसांनी अकोला येथील शासकीय रुग्णालयात रात्री ९ वाजता दाखल केले. त्यांच्याजवळील रक्कम, २० ग्रॅम सोने, डिकीतील कागदपत्रे गहाळ करून त्यांच्याजवळ ओळख पटविण्यासाठी सबळ पुरावे असताना त्यांना बेवारस अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. ५२ तास शासकीय रुग्णालयात ते बेशुद्ध होते. त्यांच्या अपघाताची माहिती कुटुंबीयांना मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचार करता आले नाहीत. त्यामुळे त्यांचे लहान बंधू मनोहर हरणे यांनी पोलिसांच्या विरोधात अकोला दिवाणी न्यायालयात धाव घेतली.  पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी वहिनीच्या नावाने दाखल याचिकेत केला होता. 

वारसांना रक्कम मिळू नये म्हणून...वारसांना ही रक्कम मिळू नये, यासाठी पोलिसांनी अनेकदा न्यायालयात विविध अर्ज केले. अंतिम निर्णयासाठी ही याचिका जिल्हा न्यायालयात वर्ग केली. सन १९९३ मध्ये या याचिकेचा निकाल लागून ४८ लाख डिक्रीची रक्कम वारसांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. डिक्रीची रक्कम भरावी लागू नये म्हणून पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात डिक्रीची रक्कम जमा करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले. ही रक्कम बँकेमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ही रक्कम नागपूर येथील स्टेट बँकेत जमा केली.