लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दोन वर्षांपूर्वी खरीप पिकांचा विमा न काढलेल्या जिल्ह्यात चार तालुक्यातील शेतकर्यांना पीक विम्याच्या ५0 टक्के रकमेची मदत वाटप करण्यासाठी ४ कोटी ७४ लाख २0 हजार रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.सन २0१५ च्या खरीप हंगामात पीक विमा न काढलेल्या शेतकर्यांना पीक विम्याच्या ५0 टक्के रक्कम मदत वाटपाचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला होता. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पीक विमा न काढलेल्या शेतकर्यांना पीक विमा रकमेच्या ५0 टक्के मदत वाटप करण्यासाठी गतवर्षी (२0१६)शासनामार्फत ६0 कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. उपलब्ध निधीतून गत मार्च अखेरपर्यंत ५0 कोटी ६४ लाख रुपयांचा निधी जिल्ह्यातील शेतकर्यांना वाटप करण्यात आला. उर्वरित ९ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी गत मार्चअखेर अखर्चित राहिल्याने हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनजमा करण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील अकोला, अकोट,तेल्हारा व मूर्तिजापूर या चार तालुक्यातील ८ हजार ७४७ शेतकर्यांना पीक विम्याच्या ५0 टक्के मदत वाटप करण्यासाठी ४ कोटी ७४ लाख २0 हजार ६१0 रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला. संबंधित चारही तहसीलदारांच्या मागणीनुसार निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
पीक विमा न काढलेल्या शेतकर्यांच्या मदतीसाठी हवे ४.७४ कोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:57 IST
अकोला: दोन वर्षांपूर्वी खरीप पिकांचा विमा न काढलेल्या जिल्ह्यात चार तालुक्यातील शेतकर्यांना पीक विम्याच्या ५0 टक्के रकमेची मदत वाटप करण्यासाठी ४ कोटी ७४ लाख २0 हजार रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
पीक विमा न काढलेल्या शेतकर्यांच्या मदतीसाठी हवे ४.७४ कोटी !
ठळक मुद्देनिधीसाठी जिल्हाधिकार्यांचा प्रस्ताव