शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू माध्यमाच्या ४६ अतिरिक्त शिक्षकांचे मनपा, नगर परिषद शाळांमध्ये समायोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:47 IST

अकोला: जिल्ह्यात उर्दू माध्यमाची एकही जागा रिक्त नसल्यामुळे ४६ अतिरिक्त शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात आले.

अकोला: जिल्ह्यात उर्दू माध्यमाची एकही जागा रिक्त नसल्यामुळे ४६ अतिरिक्त शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात आले. मंगळवारी उपसंचालक स्तरावर या सर्व शिक्षकांचे महापालिका, नगर परिषदेच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. यातील अनेक शिक्षकांचे शेगाव, नांदुरा नगर परिषद शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन झाले.जिल्ह्यातील उर्दू माध्यमांचे खासगी अनुदानित शाळांमधील ६२ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी तीन शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन करण्यात आल्यानंतर उर्वरित शिक्षकही सेवाज्येष्ठतेमुळे अतिरिक्त यादीतून कमी झाल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या ४६ वर आली. तीन रिक्त जागा वगळता जिल्ह्यातील इतर खासगी उर्दू शाळांमध्ये एकही पद रिक्त नसल्यामुळे ४६ शिक्षकांचे समायोजन करावे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. उर्दू शिक्षकांना जिल्ह्यातच समायोजन करण्याची अपेक्षा होती; परंतु जागाच नसल्यामुळे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी ४६ उर्दू शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे पाठविले. त्यांच्या नावांची यादी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविल्यानंतर मंगळवारी शिक्षण उपसंचालक पेंदोर यांनी शिक्षणाधिकारी मुकुंद यांच्या उपस्थितीत अकोला जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील नगर परिषदेच्या उर्दू शाळांमध्ये समायोजन केले. यातील काही अतिरिक्त शिक्षकांचे महापालिकेच्या उर्दू शाळांमधील रिक्त पदांवर तर काहींचे बाळापूर, अकोट, मूर्तिजापूर नगर परिषद उर्दू शाळांसोबत बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा नगर परिषदेच्या उर्दू शाळांमध्ये समायोजन केले. यात शेगाव व नांदुरा येथील शाळा मिळाल्यामुळे जिल्ह्यातील उर्दू शिक्षक खिन्न झाले आहेत. अकोल्यातून त्यांनी तालुक्यांसह बाहेरील जिल्ह्यात अप-डाउन करावे लागणार आहे. (प्रतिनिधी) 

जिल्ह्यातील ४६ अतिरिक्त उर्दू शिक्षकांचे १00 टक्के समायोजन केल्याचे समायोजन आहे. खासगी अनुदानित उर्दू शाळांमध्ये रिक्त पदे नसल्यामुळे अतिरिक्त उर्दू शिक्षकांचे जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर समायोजन करावे लागले. या शिक्षकांना लवकरच शाळांमध्ये रुजू होण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक स्तरावरून देण्यात येतील.-प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक