शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

वर्षभरात ४५१ नवजात बालकांचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:25 IST

अकोला : संपूर्ण जिल्हय़ासह लगतच्या जिल्हय़ांमधील गर्भवती  स्त्रियांसाठी आधार ठरलेल्या येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील  विशेष नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू)मध्ये एप्रिल  २0१६ ते मार्च २0१७ या एका वर्षाच्या कालावधीत दाखल  झालेल्या ४१५२ नवजात बालकांपैकी ४५१ बालके  दगावल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा स्त्री रुग्णालय‘एसएनसीयू’मधील बालक मृत्यूदराने  वेधले मानवाधिकार आयोगाचे लक्ष

अतुल जयस्वाल । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण जिल्हय़ासह लगतच्या जिल्हय़ांमधील गर्भवती  स्त्रियांसाठी आधार ठरलेल्या येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील  विशेष नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू)मध्ये एप्रिल  २0१६ ते मार्च २0१७ या एका वर्षाच्या कालावधीत दाखल  झालेल्या ४१५२ नवजात बालकांपैकी ४५१ बालके  दगावल्याची माहिती समोर आली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात  बालकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराची राष्ट्रीय मानवाधिकार  आयोगाने दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.‘लेडी हार्डिंग’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा स्त्री  रुग्णालयात केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या वाशिम,  बुलडाणा, हिंगोली व अमरावती जिल्हय़ातूनही अनेक गर्भवती  महिला प्रसूतीसाठी येतात. दिवसेंदिवस येथे प्रसूतीसाठी येणार्‍या  महिलांचे प्रमाण वाढतच असले, तरी त्यादृष्टीने येथील सोयी- सुविधांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. या रुग्णालयात  विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या बालकांसाठी वर्ष  २0१३ मध्ये विशेष नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू)ची  स्थापना करण्यात आली. तब्बल ४८ एन्क्युबेटर असलेले ये थील ‘एसएनसीयू’ हे राज्यातील एकूण ३६ एसएनसीयूमध्ये  सर्वात मोठे आहे. येथील एसएनसीयूमध्ये दर महिन्याला मोठय़ा  संख्येने आजारी बालकांना दाखल करून घेतले जाते. एप्रिल  २0१६ ते मार्च २0१७ या एका वर्षाच्या कालावधीत या  रुग्णालयात एकूण १५९८४ बालकांनी जन्म घेतल्याची नोंद  आहे. यापैकी ४१५२ बालकांना ‘एसएनसीयू’मध्ये ठेवावे लागले. या  बालकांपैकी ४५१ बालकांना वाचविण्यात डॉक्टरांना अपयश  आले. येथे येणारी नवजात बालके कमी दिवसांची, कमी  वजनाची किंवा संसर्ग झालेली असतात, त्यामुळे या  एसएनसीयूची स्थापना झाल्यापासूनचा मृत्यूदर वाढताच आहे. येथील एसएनसीयूसाठी ४0 परिसेविकांची गरज असताना येथे  फक्त २४ परिसेविका आहेत.

‘एसएनसीयू’चा मृत्यूदर १0.८६ टक्केजिल्हा स्त्री रुग्णालयात अतिजोखमीच्या माता प्रसूतीसाठी येता त. या मातांच्या बालकांना ‘एसएनसीयू’मध्ये ठेवण्याची गरज  असते. तसेच इतर ठिकाणांहून येथे दाखल करण्यात येणारी  बालकेही अत्यंत गंभीर अवस्थेत असतात. त्यामुळे  एसएनसीयूचा मृत्यूदर हा नेहमीच जास्त राहतो. स्त्री रुग्णालया तील एसएनसीयूचा मृत्यूदर १८ टक्क्यांवरून १0.८६ टक्क्यां पर्यंत खाली आणण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आल्याचा  दावा वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी केला  आहे.

मानवाधिकार आयोगाने बजावली राज्य शासनाला नोटीसअकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये  वर्षभरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नवजात शिशूंचा मृत्यू  झाल्याच्या वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने  राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी करून सहा  आठवड्यांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.  ‘अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या अनेक नवजात  बालकांच्या मृत्यूबाबतच्या बातम्यांची आपण स्वत:हून दखल  घेतलेली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बालकांचा मृत्यू होणे हे  राज्य सरकार, रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित विभागाच्या  निष्काळजीपणाचे निदर्शक आहे. हे नवजात बालके  आणि  त्यांच्या कुटुंबांच्या मानवाधिकाराचे गंभीर उल्लंघन  केल्यासारखेच आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने ठरावीक  मुदतीत चौकशी करणे आवश्यक आहे’, असे आयोगाने म्हटले  आहे.  

‘एसएनसीयू’चा मृत्यूदर कमी करण्यासाठी आम्ही आटोकाट  प्रयत्न करीत असून, गत चार वर्षांत हा दर कमी करण्यात आम्ही  यश मिळविले आहे. आमच्या ‘एसएनसीयू’मधील बालकांचा  मृत्यूदर सामान्य आहे. याबाबत राज्य सरकारला नोटीस  बजावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे; परंतु आतापर्यंत  ही नोटीस आम्हाला प्राप्त झाली नाही. - डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल