शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘शौर्य दिन’निमित्त अकोल्यात उभारणार ४२ फूट उंच विजयस्तंभ प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 12:59 IST

अकोल्यात ४२ फूट उंचीच्या विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड़ सी. ए. दंदी व प्रा. एम. आर. इंगळे यांनी दिली.

अकोला : नवीन वर्षाचा पहिला दिवस हा ‘शौर्य दिवस’ आहे. भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. देशातील पेशवाईचा, जातीयतेचा, विषमतेचा आणि वर्णव्यवस्थेचा या दिवशी अंत झाला होता. यावर्षी त्या घटनेला २०१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त अकोल्यात ४२ फूट उंचीच्या विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड़ सी. ए. दंदी व प्रा. एम. आर. इंगळे यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. महार रेजिमेंटच्या शूर पराक्रमाचे प्रतीक असलेल्या पुणे शहराच्या शेजारील भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभ उभा आहे. या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वर्षी १ जानेवारी रोजी उपस्थित राहत होते. १८१८ पासून हा स्तंभ दिमाखाने उभा आहे. या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी अकोला जिल्ह्यातील जनता काही कारणाने जाऊ शकत नाही, त्यांना अकोल्यात प्रतिकृती उभारून मानवंदना देण्याचे समाधान मिळावे, यासाठी लॉर्ड बुद्धा फाउंडेशन व वंदना संघ आणि संघर्ष युवा फाउंडेशन यांनी अकोल्यात अशोक वाटिका येथे विजयस्तंभाची प्रतिकृती उभी करून या स्तंभाची गरिमा व शूरता दर्शविणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये भन्ते विशालकीर्ती, महादेव तायडे, इरभान तायडे व यशवंत इंगोले यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम होणार आहे. उद्घाटन डॉ. मेघा तिडके करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद भोजने असतील. त्यावेळी समता सैनिक दल विजयस्तंभाला मानवंदना देतील. त्यानंतर बुद्ध, धम्म, संघ वंदना घेण्यात येईल. प्रेरणा देणारे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आले. यावर्षी दिलीप मोहोड, अशोक खंडारे, प्रा. सुरेश मोरे, हरीश काळे, शांताराम पळसपगार, सुरेंद्र तिडके, भीमराव इंगळे, दीपक खंडारे, सुरेंद्र अहीर व युवराज सिरसाट हे विजयस्तंभाला पुष्पचक्र वाहण्याचे मानकरी आहेत. कार्यक्रमाची सांगता गजानन शेगावकर यांचा भीम गीतगायनाच्या कार्यक्रमाने होईल, अशी माहिती यावेळी अ‍ॅड़ दंदी यांनी दिली. 

 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारAkolaअकोला