शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला विभागातील ४१९ बसगाड्यांना लवकरच 'जीपीएस सिस्टीम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:56 IST

 अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागातील ४१९ बसगाड्यांना लवकरच जीपीएस (ग्लोबल पोजीशन सिस्टीम) जोडल्या जाणार आहे.

- संजय खांडेकर

 अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागातील ४१९ बसगाड्यांना लवकरच जीपीएस (ग्लोबल पोजीशन सिस्टीम) जोडल्या जाणार आहे. त्यामुळे एसटी विभागासोबतच प्रवाशांनादेखील या सुविधेचा लाभ मिळणार आहे. मुंबई येथील कंपनीला जीपीएस लावण्याचा कंत्राट देण्यात आला आहे.राज्याची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी गाडी हायटेक करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न गत काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. राज्यभरातील बसगाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर मध्यंतरी वाय-फाय सुविधा देण्यात आली. एका कंपनीसोबत करार करून एक विशिष्ट कार्यक्रम प्रवाशांच्या सेवेत होता; मात्र काही अपरिहार्य कारणामुळे वाय-फाय सेवा राज्यभरात बंद पडली. त्यानंतर राज्यातील बसगाड्यांचे लोकेशन घेण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक बसगाडीला जीपीएसने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी नाशिक विभागातून करण्यात आली आहे. येथील दीड हजार बसगाड्या आता आपले लोकेशन देत राज्यात धावत आहेत. त्याच धर्तीवर लवकरच अकोला विभागातील ४१९ बसगाड्यांना जीपीएस जोडले जाणार आहे. ज्या बसगाड्या नव्याने आगारात दाखल होत आहेत, त्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन जीपीएस शिवाय करू नये, असा आदेश परिवहन मंडळाने दिला आहे.अचून लोकेशन सोबतच मिळेल स्पीडची माहितीकुठून कुठे धावणारी बस सध्या कोणत्या स्थानकावर आहे, त्या बसगाडीची सध्या स्पीड किती आहे आणि आपल्याला हव्या असलेल्या स्थानकावर ही गाडी केव्हा पोहोचेल, याची अचूक माहिती आता प्रवाशांना मिळणे शक्य होणार आहे. अकोल्यातील दोन आगारांसोबतच, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, वाशिम, कारंजा, मानोरा, रिसोड या ९ आगारातील एकूण ४१९ बसगाड्यांना जीपीएस लागणार आहे.

 

टॅग्स :state transportएसटीAkolaअकोला